मायक्रोसॉफ्टमधील बिघाडाने विमानतळ, बँका खोळंबल्या; जगभर जाणवतो परिणाम

वॉशिंग्टन: मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे जगभरातील वापरकर्त्यांना अडचणींचा सामना करावा लागतो आहे. अनेकांचे संगणक, लॅपटॉप अचानक बंद पडत असून त्यावर निळ्या रंगाची स्क्रीन दिसत आहे. यामुळे जगभरातील बॅंका, विमानतळांचे कामदेखील खोळंबले आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Sat, 20 Jul 2024
  • 11:12 am
Microsoft, malfunction

संग्रहित छायाचित्र

आर्थिक व्यवहार, हवाई सेवा ठप्प

वॉशिंग्टन: मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे जगभरातील वापरकर्त्यांना अडचणींचा सामना करावा लागतो आहे. अनेकांचे संगणक, लॅपटॉप अचानक बंद पडत असून त्यावर निळ्या रंगाची स्क्रीन दिसत आहे. यामुळे जगभरातील बॅंका, विमानतळांचे कामदेखील खोळंबले आहे. विशेष म्हणजे मायक्रोसॉफ्टनेही या घटनेची दखल घेतली असून यावर तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे म्हटले आहे.

मायक्रोसॉफ्टच्या वापरकर्त्यांनी ‘एक्स’ वर पोस्ट शेअर करत अनेक तक्रारी केल्या आहेत. काम करत असताना अचानक आपले लॅपटॉप बंद पडत असल्याचे त्यांनी म्हटलं आहे. तसेच तुमचा संगणक अडचणीत असून रिस्टार्ट करणे आवश्यक असल्याचा संदेश स्क्रीनवर येत असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. क्राऊड स्ट्राइक अपडेट नंतर येत आहे, ही समस्या येत असल्याची तक्रारही काहीजणांनी केली आहे. दरम्यान, मायक्रोसॉफ्टने या तक्रारींची दखल घेतली आहे. ‘एक्स’ वर पोस्ट करत मायक्रोसॉफ्टने या संदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड झाल्याने जगभरातील संगणक, लॅपटॉप प्रभावित झाले आहेत. आम्ही याची दखल घेतली असून याबाबत माहिती घेत आहोत. लवकर ही सेवा पूर्ववत करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे कंपनीने म्हटलं आहे.

क्राऊडस्ट्राईकने या संदर्भात निवेदन जारी केलं आहे. आम्ही या तक्रारींची माहिती घेत असून जोपर्यंत पुढील सूचना येत नाही, तोपर्यंत प्रतीक्षा करावी, असे त्यांनी या निवेदनात म्हटलं आहे. याबरोबरच विंडोजवर चालणाऱ्या संगणकांमध्ये बीएसओडीची समस्या निर्माण झाली असून या समस्येचे निराकरण करण्याचा प्रयत्न करू नये, अशी सूचनादेखील त्यांनी केली आहे.
मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत झालेल्या बिघाडाचा फटका भारतासह जगभरातील बॅंका आणि विमान सेवेलाही बसला आहे. मुंबईसह देशभरातील अन्य काही महत्त्वाच्या विमानतळांवर सर्व्हर ठप्प झाल्याची माहिती आहे. त्यामुळे प्रवाशांनाही अनेक अडचणींचा सामना करावा लागतो आहे. स्पाईसजेटनेही विमानसेवा ठप्प झाल्याचे म्हटलं आहे. विमानसेवेबरोबरच बॅंकांचे व्यवहारदेखील ठप्प झाले आहेत. वृत्तसंंस्था

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest