File Photo
इस्लामाबाद:पाकिस्तानातील लाहोरला जगातील सर्वात प्रदूषित शहर घोषित करण्यात आले आहे. पाकिस्तानच्या पंजाब सरकारने मंगळवारी (२२ ऑक्टोबर) धुक्याच्या संकटाचा सामना लाहोरमध्ये कृत्रिम पाऊस पाडण्याची घोषणा केली आहे.
लाहोरमधील एक्यूआय पातळी जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) हवेच्या गुणवत्ता मार्गदर्शक मूल्याच्या ५५.६ पट जास्त आहे.भारतीय सीमावर्ती राज्य म्हणजे पंजाब,हरियाणा, या राज्यातील शेतकरी शेतात खुट किंवा उसाचे पाचट जाळत असतात. यामुळे लोहोर मध्ये काजळी पसरली आहे, असा आरोप पाकिस्ताने केला आहे.
हवेच्या गुणवत्तेची पातळी मोजण्यासाठी वापरला जाणारा एअर क्वालिटी इंडेक्स (एक्यूआय) नुसार लाहोरमधील हवेच्या गुणवत्तेची पातळी ३९४ वर पोहोचली आहे. त्यामुळे या आयक्यू इंडेक्सनुसार धोकादायक मानल्या गेलेल्या शहरामध्ये लाहोरचा समावेश झाला आहे. ‘आयक्यू एअर’ हवेतील पीएम २.५ कणांच्या एकाग्रतेवर आधारित हवेच्या गुणवत्तेची पातळी मोजते.
पाकिस्तानच्या हवामान खात्याने (पीएमडी) मंगळवारी धुक्याच्या वाढत्या पातळीबाबत एक अहवाल जारी केला. औद्योगिक प्रदूषण आणि वाहनांच्या उत्सर्जनामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचे या अहवालात म्हटले आहे. पीएमडीने इशारा दिली की, धुक्याच्या संकटामुळे श्वसनाचे गंभीर आजार होऊ शकतात आणि रस्त्यांची दृश्यमानता कमी होऊ शकते; ज्यामुळे अपघात होऊ शकतात. वर्षानुवर्षे, या शहराचे नाव नियमितपणे जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांच्या यादीत येत आले आहे. वृत्तसंंस्था