"जपानमध्ये तांदळाची तीव्र टंचाई: २५ वर्षांत पहिल्यांदाच सुपरमार्केटमध्ये तांदूळ संपला"

जपानमध्ये तांदळाची टंचाई आणि टायफून सीझनमधील वादळांच्या इशाऱ्यानंतर नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर तांदळाची खरेदी केली आहे. या परिस्थितीचा परिणाम म्हणजे तांदळाच्या साठवणुकीत कमी आणि त्याच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता आहे. टायफूनच्या वादळांमुळे जपानमध्ये कृषी उत्पादनावर परिणाम झाला आहे, ज्यामुळे तांदळाची उपलब्धता कमी झाली आहे. या सर्व परिस्थितीला प्रतिसाद म्हणून नागरिकांनी जास्तीत-जास्त तांदळाचा साठा करणे सुरू केले आहे.

टोकिओ : आशियाई देशात भात हे जनतेचे मुख्य अन् असले तरी सध्या जपानमध्ये तांदळाची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. गेल्या काही आठवड्यांपासून देशातील अनेक सुपरमार्केटमधील तांदूळ संपला  असून २५ वर्षात प्रथमच अशी स्थिती देशात निर्माण झाली आहे. ज्या सुपरमार्केटमध्ये तांदूळ उपलब्ध आहे, तेथे लोकांना कमी प्रमाणात तांदूळ देण्याचे आवाहन केले जात आहे.

खरे बघायला गेले तर जपानच्या सरकारने जनतेला टायफून सीझनमधील वादळे, भूकंपाच्या धोक्याबाबत इशारा दिला होता. यामुळे देशात घबराट निर्माण होऊन नागरिकांनी तांदळाची खरेदी मोठ्या प्रमाणावर वाढवली आहे. भविष्यातील तांदूळाच्या टंचाईमुळे नागरिकांनी तांदळाचा साठा करण्यास सुरुवात केली आहे. सरकारच्या मते याच कारणामुळे सध्या बाजारात तांदळाची टंचाई जाणवत आहे.

जपानमध्ये मे ते नोव्हेंबर हा काळ टायफून सीझन असल्याचे मानतात. या काळात सुमारे २० वादळे येतात. वादळांच्या परिणाम म्हणून देशभर अतिवृष्टी, भूस्खलन आणि पूर येतो. वादळाच्या हंगामातही म्हणजे ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये सर्वाधिक वादळे येतात. यावर्षी १९ ते २१ वादळ येण्याची शक्यता आहे. जपान सरकारने याच वादळांचा इशारा दिला होता. त्याचा परिणाम म्हणून नागरिकांनी घाबरून घरांमध्ये तांदळाचा साठा केला आहे. 

तांदळाच्या टंचाईच्या पार्श्वभूमीवर सरकारने लोकांना शांततेचे आवाहन केले. कृषी मंत्री तेताशी साकामोटो म्हणाले की, देशात काही ठिकाणी तांदळाच्या साठ्याची कमतरता आहे. आम्ही लवकरच त्यावर मात करू. सध्या तांदळाचा पुरेसा साठा आहे. 

भाताचे पीक वर्षातून एकदाच घेतले जाते. नवीन भाताची काढणी सप्टेंबरमध्ये सुरू होईल, त्यानंतर बाजारात नवीन पीक आल्याने परिस्थिती सुधारेल. दीर्घ सुट्ट्या आणि विक्रमी परदेशी पर्यटक यामुळे तांदळाचा तुटवडा १ ३ऑगस्टपासून जपानमध्ये ओबोन महोत्सव सुरू झाला आहे. या उत्सवादरम्यान लोक त्यांच्या पूर्वजांना आदरांजली वाहतात.

त्यांच्या स्मरणार्थ उत्सव साजरे केले जातात. या सणानिमित्त लोक दीर्घ सुट्टीवर आहेत. त्यामुळे तांदळाची मागणी वाढली आहे. त्यातच यंदा जपानमध्ये विक्रमी संख्येने विदेशी पर्यटक आले आहेत. त्यामुळे भाताची टंचाई निर्माण झाली आहे. जपान नॅशनल टुरिझम ऑर्गनायझेशनच्या अहवालानुसार यावर्षी जूनपर्यंत ३१ लाखांहून अधिक परदेशी पर्यटकांनी जपानला भेट दिली. 

अमेरिकेच्या कृषी विभागाच्या विदेशी कृषी सेवा अहवालानुसार, २०२३-२४ मध्ये जपानमध्ये तांदळाचे एकूण उत्पादन ७.३ दशलक्ष टन होते तर तांदळाचा वापर ८.१ दशलक्ष टन होता. जुलै १९१८  मध्ये जपानमध्ये तांदळाचा तुटवडा आणि वाढत्या किमतींमुळे आंदोलने झाली होती. तांदळाच्या वाढत्या किमतीमुळे शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांनी सरकारचा निषेध करण्यास सुरुवात केली.

या आंदोलनाला लवकरच हिंसक वळण लागले आणि अनेक ठिकाणी जाळपोळ, लूटमार, पोलीस स्टेशन आणि सरकारी कार्यालयांवर हल्ले झाले. आंदोलनामुळे तत्कालिन पंतप्रधान तेरौची मसाटके यांना राजीनामा द्यावा लागला होता. आंदोलन काळात २५ हजार लोकांना अटक करण्यात आली होती.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest