इराणचे अध्यक्ष अपघातात ठार; अझरबैजानहून परतताना हेलिकॉप्टर कोसळले

तेहरान : इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी यांचे हेलिकॉप्टर अपघातात निधन झाल्याने साऱ्या देशाला धक्का बसला आहे. रईसी यांच्या समवेत परराष्ट्रमंत्री अब्दुल्लाहियन यांचेही अपघातात निधन झाले आहे. रईसी यांच्या निधनाने इराणवर शोककळा पसरली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Edited By Desk User
  • Tue, 21 May 2024
  • 04:29 pm
Ebrahim Raisi

संग्रहित छायाचित्र

इब्राहिम रईसी यांच्यासमवेत परराष्ट्रमंत्रीही ठार

तेहरान : इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी (Ebrahim Raisi) यांचे हेलिकॉप्टर अपघातात निधन झाल्याने साऱ्या देशाला धक्का बसला आहे. रईसी यांच्या समवेत परराष्ट्रमंत्री अब्दुल्लाहियन यांचेही अपघातात निधन झाले आहे.  रईसी यांच्या निधनाने इराणवर शोककळा पसरली आहे. रईसींच्या निधनाने इराणमध्ये पाच दिवसांचा शोक दिन पाळण्यात येणार आहे. इराणने काही दिवसांपूर्वी इस्राएलवर हवाई हल्ला करून युद्धाला तोंड फोडले होते. त्यानंतर इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी यांचे हेलिकॉप्टर अपघातात निधन झाले. यामुळे इराणमध्ये राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे.    

रईसी हे हेलिकॉप्टरने अझरबैजानहून परतत असताना त्यांचे हेलिकॉप्टर कोसळले. त्यात त्यांचे निधन झाले. त्यांच्या हेलिकॉप्टरचा १७ तास शोध घेतल्यानंतर शोध पथकाला हेलिकॉप्टर सापडलं आहे. हेलिकॉप्टर जळून खाक झालं आहे. अपघाताचे फोटोही समोर आले आहेत. अपघातात रईसी यांच्यासह कोणीही वाचलेलंं नाही. अपघाताचा एक ड्रोन व्हीडीओ समोर आला असून त्यात हेलिकॉप्टर बेचिराख झाल्याचे दिसते .

अध्यक्ष इब्राहिम रईसी यांचा जन्म इराणच्या मशहद शहरात १९६० मध्ये झाला. रईसी यांचे वडील मौलवी होते. रईसी पाच वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांचं निधन झालं. धर्म आणि राजकारण हे रईसी यांचे आवडते विषय होते. महाविद्यालयीन जीवनापासूनच त्यांनी आंदोलनांमध्ये, विविध चळवळींमध्ये भाग घेतला.

इब्राहिम रईसींनी इराणच्या न्याय व्यवस्थेत काम केले होते. तसंच अनेक वादग्रस्त निर्णयही त्यांनी घेतले होते.  १९८८ मध्ये इराणच्या कैद्यांना सामूहिक फाशी देण्यात आली होती. या निर्णय प्रक्रियेत रईसी सहभागी होते. या सामूहिक फाशीच्या शिक्षेत कमीत कमी ५ हजार कैद्यांना फाशी देण्यात आल्याची माहिती आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटने दिली आहे. ही शिक्षा सुनावणारा जो आयोग होता, त्या आयोगाचे एक सदस्य रईसी होते. या सगळ्या घडामोडींनंतर त्यांनी इराणच्या राजकारणात प्रवेश केला.

रईसी यांनी इराणच्या अध्यक्षपदाची निवडणूक दोनदा लढवली. २०१७ मध्ये ते ही निवडणूक हरले होते. २०२१ मध्ये त्यांनी ही निवडणूक जिंकली होती.                       

इराण काय म्हणते ?

इराणच्या (Iran) प्रेस टीव्हीने ‘एक्स’ च्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, बचाव पथकाने अध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्या अपघातग्रस्त हेलिकॉप्टरची ओळख पटवली आहे. त्यांना तेथे कोणीही जिवंत आढळले नाही. अध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्या ताफ्यात एकूण तीन हेलिकॉप्टर्स होती. त्यातली दोन सुखरूप परतली. मात्र इब्राहिम रईसी आणि परराष्ट्रमंत्री अब्दुल्लाहियन, ज्यामध्ये होते ते हेलिकॉप्टर कोसळलं आणि अपघात झाला. १६ तासांहून अधिक काळ शोधमोहीम चालू होती. आता पथकाला हेलिकॉप्टरचे अवशेष मिळाले आहेत. या घटनेत इब्राहिम रईसींसह हेलिकॉप्टरमध्ये बसलेल्या सगळ्यांचा मृत्यू झाला आहे.

इराणी वृत्तसंस्थांच्या माहितीनुसार रईसी यांच्या हेलिकॉप्टरचा अपघात रविवारी दुपारी १ वाजता म्हणजे भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी ३ वाजता झाला. यानंतर शोधमोहीम सुरू करण्यात आली. इब्राहिम रईसी यांच्याबाबत कुठलीही माहिती तातडीने समोर आलेली नाही. युद्धपातळीवर बचावकार्य सुरू असले तरी धुके आणि खराब हवामानामुळे बचावकार्यात अडथळे येत होते. या अपघातामुळे इराणची चिंता वाढली आहे. राष्ट्रपती रईसी हे सुखरूप परत येतील, असा विश्वास आम्हाला होता, असे इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खैमी यांनी म्हटलं होतं. 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest