संग्रहित छायाचित्र
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि अध्यक्षीय निवडणुकीतील रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर १३ जुलै रोजी झालेल्या हल्ल्यामागे इराणचा हात असल्याची चर्चा होत आहे. जानेवारी २०२० मध्ये डोनाल्ड ट्रम्प अध्यक्ष असताना त्यांनी इराणचे जनरल कासिम सुलेमानी यांची हत्या करण्याचा आदेश दिला होता. तेव्हापासून ते इराणच्या निशाण्यावर आहेत. इराणचे सर्वोच्च धार्मिक नेते अयातुल्ला खामेनी यांच्यानंतर सर्वात मोठे सत्ता केंद्र कासिम अली हे होते. खामेनी यांच्यानंतर देशात त्यांचा शब्द मानला जात असे. मात्र, अमेरिका त्यांना आपला शत्रू मानत होती. इराणवरील अमेरिकेचे अनेक हल्ले अयशस्वी ठरविण्यात त्यांचा वाटा होता.
ट्रम्प हल्ल्यामागे इराण असण्याची चर्चा होते त्याचे कारण म्हणजे इराणला जनरल कासिम सुलेमानी यांच्या मृत्यूचा सूड घ्यायचा होता.सीएननच्या वृत्तानुसार अमेरिकेतील अधिकाऱ्यांना ट्रम्प हत्येचा कट रचला जात असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानंतर ट्रम्प यांची सुरक्षा वाढवण्यात आली होती. तसंच हल्ल्यानंतरही त्यांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. इराणने मात्र हे आरोप फेटाळले आहेत. अमेरिकेतील इराणच्या प्रवक्त्याने म्हटलं आहे की इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणच्या दृष्टीकोनातून डोनाल्ड ट्रम्प हे एक गुन्हेगार आहेत.
त्यांच्यावर सुलेमानी यांची हत्या करण्याचा आदेश दिल्याप्रकरणी खटला दाखल केला गेला पाहिजे आणि त्यांना शिक्षा झाली पाहिजे. इराणने न्यायासाठी कायदेशीर मार्ग अवलंबला आहे. तसेच अमेरिकेतील गुप्तचर यंत्रणांना एका माणसाने इराण ट्रम्प यांच्या हत्येचा कट रचत असल्याचं सांगितलं होतं.अमेरिकेतल्या एका सुरक्षा अधिकाऱ्याने अशी माहिती दिली आहे की पेनसेल्वेनियातील प्रचारसभेच्या आधी सिक्रेट सर्व्हिस एजन्सी आणि डोनाल्ड ट्रम्प यांची कॅम्पेन टीम यांना हल्ला होऊ शकतो अशी कल्पना आम्ही दिली होती. त्यानंतर सिक्रेट सर्व्हिस एजन्सीने डोनाल्ड ट्रम्प यांच्या सुरक्षेत वाढ केली. या सगळ्या गोष्टी ट्रम्प यांच्यावर हल्ला होण्यापूर्वी घडल्या होत्या. जानेवारी २०२० मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी कासिम सुलेमानी यांची हत्या करण्याचा आदेश दिला होता. तेव्हापासून ते इराणच्या निशाण्यावर आहेत.
हल्ल्यातून ट्रम्प थोडक्यात बचावले. एका शूटरने बंदुकीतून त्यांच्यावर गोळी झाडल्यावर काहीतरी गडबड असल्याचे समजून ट्र्प खाली वाकले आणि वाचले होते. त्यानंतर सिक्रेट सर्व्हिसच्या सुरक्षा अधिकाऱ्यांनी त्यांच्या भोवती कडे तयार केलं आणि सुरक्षितस्थळी हललविले. ट्रम्प हे पेनसेल्वेनियात ट्रूथ सोशल प्लॅटफॉर्मवर बोलत होते. त्याचवेळी गोळीबार झाला आणि गोळी कानाला चाटून गेली.हा प्रकार झाल्यावर हल्लेखोर सिक्रेट सर्व्हिसच्या गोळाबारात ठार झाला. सिक्रेट सर्व्हिसकडून डोनाल्ड ट्रम्प यांना सुरक्षा पुरवली जाते.
संशयास्पद महिला
ट्रम्प हल्ल्यावेळी एका महिलेच्या संशयास्पद हालचालीचा व्हीडीओ आता व्हायरल होत आहे. या व्हीडीओमध्ये दिसत असलेल्या महिलेच्या हालचाली संशयास्पद आहेत. ट्रम्प यांच्यावर ज्यावेळी गोळीबार झाला त्यावेळी ती महिला एकदम शांत दिसत होती. या घटनेचा व्हीडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेक नेटिझन्सनी म्हटलं आहे की ती महिला “शूटरच्या दिशेने” पाहत आहे. तसेच गोळीबार होताना त्या महिलेने कोणतीही धक्कादायक प्रतिक्रिया दिली नाही. एवढंच नाही तर ट्रम्प यांच्यावर गोळीबार होत असताना ती सर्व घटना मोबाईलमध्ये रेकॉर्ड करत ोती. त्यामुळे या हल्ल्याचं गूढ वाढलं आहे.
या महिलेने पांढरा पोशाख परिधान केला होता आणि काळा सनग्लास घातल्याचे व्हीडिओमध्ये दिसत आहे. गोळीबार होण्याच्या काही क्षण आधी आणि त्यानंतर तिच्या हालचाली अनेकांना संशयास्पद वाटत होत्या. गोळीबारानंतर रिपब्लिक पक्षाने सांगितलं होते की, आम्ही या घटनेची चौकशी करत आहोत. ट्रम्प यांची सभा असताना इमारतीच्या छतावर तो हल्लेखोर पोहचलाच कसा? याचा तपासही आम्ही करत आहोत. रॉयटर्सच्या वृत्तानुसार हल्लेखोराने एकाहून अधिक राऊंड फायर केले. डोनाल्ड ट्रम्प हे या हल्ल्यातून थोडक्यात बचावले. यानंतर सिक्रेट सर्व्हिसच्या सुरक्षा रक्षकांसह डोनाल्ड ट्रम्प यांच्या सुरक्षा व्यवस्थेत आणखी वाढ करण्यात आली आहे.