इंस्टाग्रामवरून इन्स्टंट तलाक; नवऱ्याच्या बाहेरख्यालीपणामुळे दुबईच्या राजकन्येने उचलले पाऊल

दुबई: सौदी अरब अमिरातीच्या राजकुमारीने इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट लिहून जाहीरपणे पतीला घटस्फोट दिला आहे. दुबईच्या शासकाची कन्या शेख महरा बिंत मोहम्मद बिन रशीद अल मकतूम हिने ‘तलाक तलाक तलाक’ असे इन्स्टाग्रामवर लिहित पती शेख माना बिन मोहम्मद बिन रशीद बिन माना अल मकतूम यांच्याशी लग्न मोडले आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Fri, 19 Jul 2024
  • 04:37 pm

संग्रहित छायाचित्र

सोशल मीडियावर होतोय कौतुकाचा वर्षाव

दुबई: सौदी अरब अमिरातीच्या राजकुमारीने इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट लिहून जाहीरपणे पतीला घटस्फोट दिला आहे. दुबईच्या शासकाची कन्या शेख महरा बिंत मोहम्मद बिन रशीद अल मकतूम हिने ‘तलाक तलाक तलाक’ असे इन्स्टाग्रामवर लिहित पती शेख माना बिन मोहम्मद बिन रशीद बिन माना अल मकतूम यांच्याशी लग्न मोडले आहे. अवघ्या दहा महिन्यांपूर्वीच या दोघांनी लग्न केले होते. तर दोन महिन्यांपूर्वीच राजकुमारीने मुलीला जन्म आहे. इन्स्टाग्रामवर लिहिलेल्या पोस्टमध्ये तिने पतीच्या विवाहबाह्य संबंधांमुळे घटस्फोट देत असल्याचे म्हटले आहे.

‘प्रिय पती, तुम्ही इतर जोडीदारासोबत व्यस्त असल्याने मी आपला घटस्फोट जाहीर करते. मी तुम्हाला घटस्फोट देते, मी तुम्हाला घटस्फोट देते आणि मी तुम्हाला घटस्फोट देते. काळजी घ्या… तुमची पूर्व पत्नी’, असे तिने लिहिले आहे. या पोस्टवर नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे. अनेकांनी तिच्या या निर्णयाचे कौतुक केले आहे. ‘जेव्हा एखाद्या सक्षम महिलेला तिचे मूल्य समजते, असे एकाने लिहिले आहे. तर ‘तुझ्या वडिलांनी तुझे संगोपन अत्यंत योग्य पद्धतीने केले आहे. तू एका राजाची कन्या आहेस. आयुष्यात कितीही कठीण काळ आला तरी तू मान वर करून चाल’, असे दुसऱ्याने म्हटले आहे. ‘अत्यंत योग्य निर्णय घेतलास, तुला आमच्याकडून शुभेच्छा’, असे नेटकऱ्यांनी म्हटले आहे.

कोण आहे दुबईची राजकुमारी?
शेखा महरा ही संयुक्त अरब अमिरातीचे उपाध्यक्ष, पंतप्रधान आणि दुबईच्या शासकांची मुलगी आहे. तिने ब्रिटनमधील एका विद्यापीठातून आंतरराष्ट्रीय संबंध यात पदवी संपादित केली आहे, तर मोहम्मद बिन रशीद सरकारी प्रशासनातूनही तिने पदवी प्राप्त केली आहे. शेखा महराचा जन्म २६ फेब्रुवारी १९९४ रोजी सौदी अरब अमिरातीतील दुबईत झाला. ती २९ वर्षांची आहे. शेखाने सुरुवातीचे शिक्षण दुबईतील एका खासगी शाळेतून पूर्ण केले.  त्यानंतर ती उच्च शिक्षणासाठी लंडनला गेली होती. शेखा महरा तिच्या सामाजिक कामांमुळेही ओळखली जाते. महिला सक्षमीकरणाचा प्रचार आणि स्थानिक डिझायनर्सचे समर्थन यामुळे ती प्रकाशझोतात होती. शेखाला घोडेस्वारीची विशेष आवड आहे. तिने अनेक घोडदौड कार्यक्रमांमध्ये भाग घेतला आहे. वृत्तसंंस्था

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest