File Photo
इस्लामाबाद:पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या पत्नी बुशरा बीबींना तोशाखाना प्रकरणी जामीन दिला आहे. बुशरां यांची १० लाख रुपयांच्या जामिनावर इस्लामाबाद हायकोर्टाने सुटका केली आहे.
त्या मागिल नऊ महिन्यांपासून रावळपिंडीच्या अदियाला तुरुंगात कैदेत होत्या. परंतु इम्रान खान अजूनही याच तुरुंगात आहेत. बुशरांची सुटका झाल्यानंतर बुशरा बनी गाला येथील त्यांच्या घरी रवाना झाल्या. यापूर्वी १३ जुलै रोजी इद्दत म्हणजेच बनावट विवाह प्रकरणात इम्रान खान आणि बुशरा यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली होती. मात्र, काही तासांनंतर या दोघांनाही नॅशनल अकाउंटेबिलिटी ब्युरोने (एनएबी) तुरुंगात अटक केली. सुटकेनंतर बुशरा बीबी पांढऱ्या कपड्यात दिसल्या. चौकटइम्रान एक वर्षांपासून तुरुंगात इम्रान रावळपिंडीच्या अदियाला तुरुंगात तीन वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये ३५० दिवसांपासून बंद आहे.
इस्लामाबादच्या स्थानिक न्यायालयाने ५ ऑगस्ट २०२३ रोजी तोशाखाना प्रकरणात त्यांना दोषी ठरवले होते. यानंतर त्यांना इस्लामाबादच्या जमान पार्क येथील घरातून अटक करून तुरुंगात पाठवण्यात आले. नंतर त्यांना आणखी २ प्रकरणात दोषी ठरवण्यात आले. मात्र, या सर्व प्रकरणात इम्रान यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
१३ जुलै रोजी बनावट निकाह प्रकरणात सुटका झाल्यानंतर त्याला तोषखान्याशी संबंधित आणखी एका प्रकरणात अटक करण्यात आली होती. खान यांना ९ मे रोजी अल-कादिर ट्रस्ट प्रकरणात अटक करण्यात आली होती. यानंतर देशातील अनेक महत्त्वाच्या लष्करी तळांवर हल्ले झाले. दोन दिवसांनी त्यांना या प्रकरणात जामीन मिळाला. वृत्तसंंस्था