वॉशिंग्टन: असे म्हणतात की नवरा बायकोची जोडी ही स्वर्गात जोडली जाते, पृथ्वीवर आपण फक्त भेटतो. मात्र सोशल मीडियावर अशी एक विचित्र घटना समोर आली आहे. एका जोडप्याला तब्बल १० वर्षांच्या संसारानंतर ते दोघे बहीण-भाऊ असल्याचे समजले आहे.
अमेरिकेतील कोलोरॅडोमधील ही विचित्र आणि धक्कादायक घटना आहे. सेलिना आणि जोसेफ यांच्या लग्नाला १० वर्षे झाली तर ते १७ वर्षांपासून एकमेकांना ओळखतात. या सुखी संसारात त्यांना तीन मुले आहेत. अचानक सेलिनाने तिची आणि तिच्या पतीची डीएनए टेस्ट करायचे ठरवले. पण डीएनए रिपोर्ट पाहिल्यावर पायाखालची जमीन सरकेल याची त्यांना कल्पना नव्हती. त्यांना या रिपोर्टनंतर कळले की जोसेफ हा सेलिनाचा चुलत भाऊ होता.
सेलिनाने तिच्या अनुभवांवर एक पुस्तक लिहिले आहे. त्यांनी इतर जोडप्यांना स्वतःचा कुटुंबवृक्ष तपासण्याचा सल्ला दिला. ही विचित्र घटना सांगणारा व्हीडीओ सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर तो तुफान व्हायरल झाला. सेलिनाने सांगितले की, तिचा नवरा प्रत्यक्षात तिचा चुलत भाऊ आहे हे पहिल्यांदा कळले तो क्षण अतिशय धक्कादायक होता. पण हे सत्य कळल्यानंतरही आम्ही आमच्या नात्यात दुरावा अथवा कटुत्व येऊ दिलेले नाही. आम्ही ठरवले की आपण जगासाठी आपले नाते आणि लग्न मोडणार नाही.