संग्रहित छायाचित्र
कोविडनंतर चीनमध्ये HMPV म्हणजेच ह्युमन मेटान्यूमो व्हायरस धुमाकूळ घालत आहे . या व्हायरसमुळे सर्व वयोगटातील लोकांना श्वसनाचे रोग होऊ शकतात. खोकला तसेच शिंकताना या व्हायरसचा संसर्ग इतरांना होतो. खोकला, ताप, नाक बंद होणं आणि श्वास घेताना धाप लागणं ही या रोगाची सामान्य लक्षणं आहे.
डिसेंबर २०२० मध्ये मध्ये चीनच्या वुहान शहरात कोविडचा रुग्ण सापडला होता. त्यानंतर कोविड महामारीने जगभरातील लाखो लोकांचा बळी घेतला. त्यानंतर पुन्हा एकदा या नवीन श्वसन रोगाच्या प्रसारामुळे जगभरात पुन्हा कोविड सारखी परिस्थिती तयार होण्याची भीती निर्माण झाली आहे.
सोशल मीडियामधील अनेक पोस्टवरून मिळलेल्या महितीनुसार चीनमध्ये HMPV चा मोठा उद्रेक झाला आहे. लहान मुलं-मुली आणि वृद्ध लोकांमध्ये या विषाणूचा मोठ्या प्रमाणात संसर्ग झाला आहे. चीनमधली हॉस्पिटल्समध्ये पेशंट्सची मोठी गर्दी बघायला मिळत आहे.
दुसरीकडे या विषाणूचा भारताला कोणताही धोका नसल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयांतर्गत येणारी 'नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल' ही संस्था अशा प्रकारच्या संसर्गाच्या प्रकरणांवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.