संग्रहित छायाचित्र
वॉशिंग्टन : अमेरिकेच्या हवाई बेटांवर स्थित किलाउवे या जगातील सर्वात सक्रिय ज्वालामुखीचा सोमवारी पहाटे दोन वाजता स्फोट झाला. स्फोटानंतर, लाव्हा २६० फूट (८० मीटर) पर्यंत उंच फेकला गेला. अमेरिकेच्या ज्वालामुखी विभागाने सोशल मीडियावर या स्फोटाचा व्हिडिओ प्रसिद्ध करून माहिती दिली.
यूएस जिओलॉजिकल सर्व्हेनुसार हा ज्वालामुखी १९८३ पासून सक्रिय आहे. अनेक वर्षांपासून वेळोवेळी किलाउवेचे उद्रेक होत असतात. ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर पडणारा वायू मानवी जीवन धोक्यात येऊ शकते त्यामुळे नेहमीच या ठिकाणांपासून दूर राहण्याचा सतर्कतेचा इशारा देण्यात येतो.
अमेरिकन एजन्सीनुसार, ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यानंतर सोडलेली राख समुद्रसपाटीपासून सहाहजार ते आठहजार फूट उंचीवर उडते. वारे दक्षिण-पश्चिम दिशेने वाहत आहेत. क्रॅकमधून बाहेर पडणारा सल्फर डायऑक्साइड वातावरणात असलेल्या इतर वायूंसोबत मिसळून मानव आणि प्राणी तसेच पिकांवर परिणाम करू शकतो. त्याच वेळी, लाव्हाची जाडी सुमारे तीन फूट आहे.
मौना लोआ हा सर्वात मोठा ज्वालामुखी
हवाई बेटावर ६ असे ज्वालामुखी आहेत, जे नेहमी सक्रिय असतात. मौना लाआचाही यात समावेश आहे. लोआ हा जगातील सर्वात मोठा ज्वालामुखी आहे, तर किलाउवे जास्त सक्रिय आहे. हा ज्वालामुखी कसा तयार झाला यावर शास्त्रज्ञ अनेक वर्षांपासून संशोधन करत आहेत. त्यात वाहत असलेल्या लाव्हाबाबत माहिती संकलित करण्यात येत आहे.
१९८४ मध्ये लाव्हा २२ दिवस वाहत होता
भूवैज्ञानिक सर्वेक्षणानुसार, मौना लोआ १८४३ पासून सुमारे ३३ वेळा उद्रेक झाला आहे. या लाव्हाचा देखील १९८४ मध्ये स्फोट झाला होता. त्यानंतर लाव्हा सलग 22 दिवस ७ किलोमीटर परिसरात वाहत होता. त्याच वेळी, २०१८ साली मौना लोआजवळ किलौआ ज्वालामुखीचा उद्रेक झाला होता. यामध्ये सुमारे सातशे घरांची पडझड झाली. यानंतर नोव्हेंबर २०२२ मध्येही येथे स्फोट झाला होता. ज्याने कोणतेही नुकसान झाले नाही, कारण त्याचा उतार खूप उंच आहे, त्यामुळे लाव्हा खाली जाण्याची शक्यता अधिक आहे.
ज्वालामुखी म्हणजे काय?
ज्वालामुखी ही पृथ्वीच्या पृष्ठभागावर असलेली नैसर्गिक विवरे आहेत. त्याद्वारे मॅग्मा, लाव्हा, राख इत्यादी वितळलेले पदार्थ पृथ्वीच्या अंतर्भागातून स्फोटांसह बाहेर पडतात. पृथ्वीवर ७ टेक्टोनिक प्लेट्स आणि २८ सब-टेक्टोनिक प्लेट्सच्या टक्करमुळे ज्वालामुखी तयार होतात.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.