Terrorist Abdul Makki: २६/११ मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड अब्दुल मक्कीचा पाकिस्तानात मृत्यू

२६/११ मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड अब्दुल मक्कीचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. २०२३ मध्ये ग्लोबल आतंकी म्हणून अब्दुल मक्कीला घोषित केले होते. मिळालेल्या माहितीनुसार, दहशतवादी मक्कीचा हृदयविकाराने मृत्यू झाला आहे. हाई शुगरमुळं लाहोरच्या एका प्रायव्हेट रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु होते.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Fri, 27 Dec 2024
  • 04:23 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News, Terrorist Abdul Makki, Abdul Makki, 26/11 Mumbai attacks, global terrorist

संग्रहित छायाचित्र

२६/११ मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड अब्दुल मक्कीचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. २०२३ मध्ये ग्लोबल आतंकी म्हणून अब्दुल मक्कीला घोषित केले होते. मिळालेल्या माहितीनुसार, दहशतवादी मक्कीचा हृदयविकाराने मृत्यू झाला आहे. हाई शुगरमुळं लाहोरच्या एका प्रायव्हेट रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु होते. 

कोण आहे अब्दुल रहमान मक्की?

अब्दुल रहमान मक्की याला हाफिज अब्दुल रहमान मक्की या नावानेही ओळखले जाते. त्याचा जन्म 1954 मध्ये पाकिस्तानातील पंजाब प्रांतातील बहावलपूर येथे झाला.  हाफीज सईदशी त्याचं थेट संबंध होते. 

  मक्की लष्कर-ए-तैयबाच्या राजकीय शाखेचे नेतृत्व करायचा. याशिवाय तो जमात-उद-दावाचा प्रमुखही होता. लष्कराच्या परराष्ट्र संबंध विभागाची जबाबदारी त्याने पार पाडली आहे. त्याची सर्व संपत्ती जप्त करण्यात आली होती. 

मक्कीला 15 मे 2019 रोजी पाकिस्तान सरकारने अटक केली होती आणि लाहोरमध्ये नजरकैदेत ठेवले होते. आता आज अखेर त्याचा मृत्यू झाला आहे.

अनेक मोठ मोठ्या हल्ल्यात अब्दुल मक्कीच हात

 22 डिसेंबर 2000 मध्ये लष्कर-ए-तैयबाच्या ६ दहशतवाद्यांनी लाल किल्ल्यावर घुसून सुरक्षा दलांवर गोळीबार केला होता. या हल्ल्यात दोन जवानांसह तीन जण ठार झाले होते.  

१ जानेवारी २००८  मध्ये ५ दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या ताफ्यावर हल्ला केला होता. यामध्ये सीआरपीएफचे ७ जवान आणि एका रिक्षाचालकाला प्राण गमवावे लागले.

मुंबईत लष्कर-ए-तैयबाने सर्वात मोठा दहशतवादी हल्ला केला होता. 10 दहशतवादी अरबी समुद्रामार्गे मुंबईत घुसले आणि त्यांनी अनेक ठिकाणी अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात 175 जणांचा मृत्यू झाला होता.

२०१८ मध्ये फेब्रुवारी १२-१३ दरम्यान श्रीनगरच्या करण नगरमधील सीआरपीएफ कॅम्पमध्ये एक आत्मघाती हल्लेखोर घुसले. यावेळी एक जवान शहीद झाला, तर एक पोलीस कर्मचारी जखमी झाला होता.

 २०१८ मध्ये बारामुल्लामध्ये लष्कराच्या दहशतवाद्यांनी तीन नागरिकांची हत्या केली होती.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest