Venezuela’s Supreme Court fined TikTok
Venezuela fines TikTok | टिकटॉक हे अॅप चीनी उत्पादन आहे. अनेक देशांमध्ये टिकटॉकवर बंदी घालण्यात आली आहे. भारतामध्येही या अॅपवर बंदी घालण्यात आली आहे. आता व्हेनेझुएलाने टिकटॉक या ॲपला एक कोटी डॉलर्सचा जबर दंड ठोठावला आहे. याचे कारण म्हणजे टिकटॉकवर युजर्ससाठी काही चॅलेज दिली जातात. हे टास्क पूर्ण करण्याच्या नादात अनेक तरुणांचा मृत्यू होत असल्याचे दिसून आले आहे. याच कारणामुळे टिकटॉकला दंड ठोठावण्यात आला आहे.
व्हेनेझुएलामध्ये ही धोकादायक चॅलेज पूर्ण करण्याच्या नादात ३ तरुण मृत्यूमुखी पडले असून जवळपास २०० जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. व्हेनेझुएलाच्या सर्वोच्च न्यायालयाने हा दंड ठोठावला आहे. सर्वोच्च न्यायालयाने टिकटॉकला दंड ठोठावताना या चिनी कंपनीने निष्काळजीपणा केल्याचा ठपका ठेवला आहे. तरुणांसाठी जीवघेण्या आणि हानीकारक मजकूर प्रसारीत होत असताना टिकटॉक अशा मजकूराच प्रतिबंध करण्यामध्ये कमी पडल्याचे
दंड त्वरित भरावा अथवा अतिरिक्त दंड भरा
चीनच्या बाईटडान्सच्या मालकीच्या टिकटॉकने आठ दिवसांच्या आत व्हेनेझुएलामध्ये कार्यालय सुरू करावे आणि दंड त्वरित भरावा किंवा अतिरिक्त दंडाला सामोरे जावे, असा आदेशही न्यायालयाने दिला आहे. टिकटॉक ही बाईटडान्स या कंपनीचे उत्पादन आहे. इन्स्टाग्राम आणि युट्युब शॉर्टचा उदय होण्यापूर्वी टीकटॉकने अक्षरश: धुमाकूळ घातला होता. टिकटॉकवर अनेकजण रीलस्टार झाले होते, आणि गावगल्लीतील तरुण-तरुणी प्रकाशझोतात आले होते. मात्र हे अॅप देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने धोकादायक असल्याचे त्यावर बंदी घालण्यास सुरुवात झाली, भारतानेही या अॅपवर बंदी घातली आहे.
टिकटॉककडून दंडापोटी जी रक्कम वसूल केली जाणार आहे तिचा वापर या अॅपच्या वापरामुळे ज्या तरुणांना, मुलांना शारिरीक, मानसिक त्रास झाला आहे अशांना नुकसान भरपाई देण्यासाठी केला जाणार आहे. टिकटॉक पीडितांसाठी एक निधी उभारण्यात येणार असून दंडाची रक्कम या निधीत वर्ग करण्यात येणार आहे.
टिकटॉकवरील जीवघेण्या चॅलेंजबद्दल बोलताना व्हेनेझुएलाच्या एका अधिकाऱ्याने म्हटले की या चॅलेंजमध्ये भाग घेणाऱ्यांना घातक रासायनिक पदार्थ हाताळण्याचे आव्हान देण्यात आले होते. टिकटॉकने संभाव्य धोके ओळखून ते रोखण्यासाठी एक धोरण तयार केले आहे, मात्र टिकटॉकवरील ही आव्हाने या धोरणाला अडगळीत टाकून व्हायरल केली जात असल्याचे दिसून आले. आपल्या मजकुरामुळे कोणाचा जीव जाणार नाही याची खात्री बाळगणं टिकटॉकसाठी गरजेचे होते, मात्र टिकटॉककडून यासाठी ठोस उपाययोजना करण्यात आल्या नाहीत. त्यामुळे या जीवघेण्या चॅलेंजचे व्हिडीओ व्हायरल झाले.