फ्रान्समधील ऐतिहासिक चर्चला भीषण आग

वॉशिंग्टन: महाराष्ट्रात शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला आणि त्यावरुन विरोधक वर्षानुवर्षे उभ्या असलेल्या पुतळ्यांची उदाहरण देत आहेत. या घटना इथे घडत असताना फ्रान्समध्ये दोन महायुद्ध पाहिलेल्या चर्चला आग लागली आहे. ज्याबाबत आता टेस्ला आणि एक्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) एलॉन मस्क यांनी घातपाताची शक्यता व्यक्त केली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Wed, 4 Sep 2024
  • 03:26 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

टेस्लाचे प्रमुख एलॉन मस्क यांनी व्यक्त केली घातपाताची शक्यता

वॉशिंग्टन: महाराष्ट्रात शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला आणि त्यावरुन विरोधक वर्षानुवर्षे उभ्या असलेल्या पुतळ्यांची उदाहरण देत आहेत. या घटना इथे घडत असताना फ्रान्समध्ये दोन महायुद्ध पाहिलेल्या चर्चला आग लागली आहे. ज्याबाबत आता टेस्ला आणि एक्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) एलॉन मस्क यांनी घातपाताची शक्यता व्यक्त केली आहे.

हे चर्च जळत असतानाचा व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या आगीमुळे चर्चची बेल खाली कोसळली आहे. एलॉन मस्क यांनी या घटनेबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे. फ्रान्सच्या सेंट ओमरमध्ये असलेले १६५ वर्षांपासून उभे असलेले चर्च जळाले आहे. अग्निशमन दलाच्या ९० कर्मचाऱ्यांनी पाच तास अथक मेहनत करुन या चर्चला लागलेली आग नियंत्रणात आणली आहे. या चर्चला आग का लागली ते समजू शकलेले नाही. मात्र हे चर्च १८५४ मध्ये बांधण्यात आले होते.  २०१८ मध्ये या चर्चचे नुतनीकरण करण्यात आले होते. मात्र या प्रकरणात पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे.

टेस्लाचे प्रमुख आणि एक्सचे सीईओ एलॉन मस्क यांनी या प्रकरणी घातपातचा संशय व्यक्त केला आहे. १८५४ मध्ये हे चर्च बांधण्यात आले होते. या चर्चने दोन महायुद्ध पाहिली आहेत. या चर्चला आग कशी लागली? ही घटना काय घडली? ही घटना म्हणजे अपघातच आहे की घातपात? असा प्रश्न एलॉन मस्क यांनी उपस्थित केला आहे. या घटनेचा व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, सेंट ओमर शहरातील चर्चला सोमवारी (२ सप्टेंबर)  पहाटे ४.३० च्या सुमारास आग लागली. यानंतर तातडीने अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. ९० जवानांनी प्रचंड मेहनतीने ही आग नियंत्रणात आणली. या घटनेत सुदैवाने जिवीतहानी झाली नाही. या प्रकरणात पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे. या घटनेचा जो व्हीडीओ व्हायरल झाला आहे त्यात आगीचे लोळ आणि धुराचे लोट दिसत होते. अग्निशमन दलाचे जवान आग नियंत्रणात आणताना दिसत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest