हिजबुल्लाह प्रमुखास संपवले; इस्राएलचे मोठे यश,

जेरुसलेम: इस्राएलच्या हल्ल्यात हिजबुल्लाहचा प्रमुख हसन नसरल्लाह मारला गेल्याचा लष्कराने दावा केला आहे. त्यांच्या माहितीनुसार शुक्रवारी लेबाननची राजधानी बैरूतमधील झैनबहिजबुल्लाहच्या मुख्यालयावर बंकर बस्टर बॉम्बने केलेल्या हवाई हल्ल्यात तेथे उपस्थित असलेला नसरल्लाह हा कन्या झैनबसह मारला गेला आहे. हिजबुल्लाहच्या प्रमुखपदी ३२ वर्षे असलेला नसरल्लाहाची हत्या हे मोठे यश आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Sun, 29 Sep 2024
  • 02:17 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

३२ वर्षे प्रमुखपद सांभाळणारे हसन नसरल्लाह कन्येसह बैरुतमधील हल्ल्यात ठार

जेरुसलेम: इस्राएलच्या हल्ल्यात हिजबुल्लाहचा प्रमुख हसन नसरल्लाह मारला गेल्याचा लष्कराने दावा केला आहे. त्यांच्या माहितीनुसार शुक्रवारी लेबाननची राजधानी बैरूतमधील झैनबहिजबुल्लाहच्या मुख्यालयावर बंकर बस्टर बॉम्बने केलेल्या हवाई हल्ल्यात तेथे उपस्थित असलेला नसरल्लाह हा कन्या झैनबसह मारला गेला आहे. हिजबुल्लाहच्या प्रमुखपदी ३२ वर्षे असलेला नसरल्लाहाची हत्या हे मोठे यश आहे.

इस्राएलच्या लष्कराने समाज माध्यमावर म्हटले आहे की, जगाला आता नसरल्लाहला घाबरण्याची गरज नाही. तो आता दहशत पसरवू शकणार नाही. नसरल्लाहच्या मृत्यूला हिजबुल्लाहने दुजोरा दिलेला नाही. इस्राएली लष्कराने बैरूतसह लेबनॉनमधील अनेक भागांवर क्षेपणास्त्र हल्ले सुरूच ठेवले आहेत. बैरूतच्या दहियाह भागातील लोकांना तातडीने हा परिसर रिकामा करण्यास सांगितले आहे. इस्राएली लष्कराच्या म्हणण्यानुसार हिजबुल्लाह इस्राएलवर हल्ला करण्यासाठी या भागाचा वापर करत असे. शुक्रवारी रात्री उशिरा इस्राएलने हिजबुल्लाहच्या मुख्यालयावर क्षेपणास्त्र हल्ला केला. यामध्ये ६ जणांचा मृत्यू झाला, तर ९० जण जखमी झाले. पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांचे संयुक्त राष्ट्राच्या आमसभेत भाषण झाल्यानंतर एक तासाने हा हल्ला झाला. हल्ल्यात नसरल्लाहची मुलगी झैनब मारली गेल्याचा दावा इस्राएली माध्यमांनी केला आहे. नसरल्लाह १९२२ पासून इराणचे समर्थन असलेल्या हिजबुल्लाह संघटनेचा प्रमुख होता. ही जबाबदारी मिळाली तेव्हा तो अवघ्या ३२ वर्षांचा होता. नसरल्लाह हे संघटनेच्या संस्थापक सदस्यांपैकी एक असून इस्राएलने हिजबुल्लाहचे संपूर्ण नेतृत्व दोन महिन्यांतच संपवले आहे. इस्राएलने ३० जुलै रोजी लेबनॉनवरील हवाई हल्ल्यात हिजबुल्लाहचा दुसरा वरिष्ठ नेता फुआद शुकरला ठार केले होते. त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे ३१ जुलैला इराणवर केलेल्या हल्ल्यात हमासचा प्रमुख इस्माइल हनियाही मारला गेला. आता हिजबुल्लाहच्या नेतृत्वात एकही ज्येष्ठ नेता उरलेला नाही. त्याच वेळी, गाझामध्ये उपस्थित असलेल्या हमासच्या नेतृत्वात फक्त याह्या सिनवार जिवंत आहे. इस्राएलने लेबनॉन सीमेवर अतिरिक्त रणगाडे आणि चिलखती वाहने तैनात केली आहेत.  

इराण दक्ष, खामेनींना हलवले

बैरूतवर झालेल्या इस्राएली हल्ल्यानंतर इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी यांनी आपल्या घरी राष्ट्रीय सुरक्षा परिषदेची तातडीची बैठक बोलावली. या बैठकीनंतर खामेनी यांना सुरक्षितस्थळी हलवल्याचे सांगण्यात येते. बैठकीत इराणचे अध्यक्ष मसूद पझाकियान यांनी इस्राएलच्या हल्ल्याचा निषेध केला. खामेनी यांचे सल्लागार अली लारिजानी म्हणाले की, इस्राएलने लाल रेषा ओलांडली आहे. माणसे मारून तोडगा निघणार नाही. त्यांची जागा इतर माणसे घेतील. इस्राएली दहशतवादाचा सामना करण्यासाठी लोक अधिक मजबूतपणे एकत्र येतील.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest