संग्रहित छायाचित्र
टोकियो: आपल्या जास्तीत आयुष्य जगता यावे असे प्रत्येकाला वाटते. पण सध्याच्या धावपळ आणि फास्टफूडच्या लाईफस्टाइलमध्ये हे शक्य होईल असे वाटत नाही. पण एका जपानी तरुणाने आयुष्य दुप्पट करण्याची क्लुप्ती शोधून काढली आहे. त्याच्या या क्लुप्तीचे जगभरात कौतुक होत आहे. मेहनत आणि शिस्तीशिवाय कोणती गोष्ट साध्य होत नाही. त्यामुळे त्यालादेखील यासाठी त्याला दररोज मेहनत घ्यावी लागते. डायसुकी होरी असे त्याचे नाव असून तो जपानच्या ह्योगो प्रांतात राहतो.
तुम्ही दिवसातले किती तास झोपता? किमान ८ तास तरी झोप असावी असे तज्ञ सांगतात. यामुळे तुमचा दिवसही चांगला जातो, असे म्हणतात. पण जपानचा डायसुकी होरी हा ४० वर्षांचा असून मागच्या १२ वर्षांत त्याने दिवसाची केवळ ३० मिनिटे इतकी झोप घेतली आहे. माझे आयुष्य दुप्पट करण्यासाठी मी या दिनचर्येचे पालन करायचो. मी माझ्या शरीर आणि मनाला अशाप्रकारे ट्रेण्ड केले आहे की केवळ ३० मिनिटांची झोप झाल्यानंतर माझे शरीर पुन्हा कामासाठी तयार होते. झोप मर्यादित ठेवल्याने माझी कार्यक्षमता सुधारल्याचे तो सांगतो. डायसुकी होरीने दिलेल्या महितीनुसार तुम्ही नियमित व्यायाम करताय आणि खाण्याच्या एक तास आधी कॉफी पिताय तर तुम्हाला उत्साह जाणवू शकतो. मन लावून काम केले तर तुम्हाला चांगल्या झोपेऐवजी गाढ झोप येईल. ज्यांना आपल्या कामासाठी निरंतर एकाग्रता हवी आहे.
त्यांना जास्त झोपेपेक्षा चांगल्या गुणवत्तेची झोप घ्यायला हवी. होरी खरेच ३० मिनिटे झोपतो का, हे पाहण्यासाठी जपानच्या योमीउरी टीव्हीने 'विल यू गो विद मी' या रिअॅलिटी शोच्या माध्यमातून ३ दिवस त्याच्यावर नजर ठेवली. तो केवळ २६ मिनिटेच झोपतो, असे यात दिसून आले. यानंतर तो एकदम ताजातवाना होतो. होरी जपानमध्ये २०१६ पासून शॉर्ट स्लीपर्स ट्रेनिंग असोसिएशनदेखील चालवतो. यामध्ये तो लोकांना झोप आणि आरोग्यासाठी मार्गदर्शन करतो. होरीने आतापर्यंत २ हजार १०० हून अधिक जणांना अल्ट्रा-शॉर्ट स्लीपर्सची ट्रेनिंग दिली आहे. दरम्यान व्हिएतनामच्या ८० वर्षीय थाई एनगोक यांनी आपण ६० वर्षे झोपलोच नसल्याचा दावा केला होता.१९६२ मध्ये आजारातून बाहेर आल्यानंतर माझी झोपण्याची क्षमता संपल्याचे त्यांनी सांगितले. विविध उपचार आणि गोळ्या खावूनदेखील मला झोप न आल्याचे त्याने सांगितले.