संग्रहित छायाचित्र
वॉशिंग्टन : अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीतून डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार आणि अध्यक्ष जो बायडेन यांनी माघार घेतल्यानंतर उपाध्यक्ष आणि भारतीय वंशाच्या कमला हॅरिस या डोनाल्ड ट्रम्प यांना कडवे आव्हान देऊ शकतात, असा निष्कर्ष निवडणूकपूर्व पाहणीतून समोर आला आहे. यामुळे रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार आणि माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोर हॅरिस यांचे आव्हान असू शकते. या पाहणीत जो बायडेनपेक्षा कमला हॅरिस राजकीयदृष्ट्या अधिक मजबूत असल्याचे आढळले आहे. त्यातच बायडेन यांनी माघार घेतल्यानंतर कमला हॅरिस यांना मिळणारा पाठिंबा मोठ्या प्रमाणावर वाढला आहे.
बायडेन यांनी निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर केलेले सर्वेक्षण अद्याप जाहीर झालेले नसले तरीही आधीच्या सर्वेक्षणानुसार डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात बायडेन यांच्यापेक्षाही कमला हॅरिस यांची कामगिरी चांगली असल्याचे दिसते. फॉक्स न्यूजच्या सर्वेक्षणात डोनाल्ड ट्रम्प हे पसंती दर्शवणाऱ्या लोकांमध्ये जो बायडेन, कमला हॅरिस यांच्यापेक्षा फक्त एका टक्क्याने आघाडीवर आहेत. सर्वेक्षणानुसार ४९ टक्के मतं डोनाल्ड ट्रम्प, बायडेन यांना ४८ टक्के तर, कमला हॅरिस यांनाही ४८ टक्के समर्थन मिळालं आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी बायडेन यांच्या प्रकृतीवरून टीका केली होती.
तसेच त्यांनी बायडेन यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांच्याविषयी नकारात्मक प्रतिक्रिया तयार झाली आहे. तसंच, काही सर्वेक्षणातून असं दिसून आलं आहे की, कमला हॅरिस या बायडेनपेक्षा १ किंवा २ गुणांनी पुढे आहेत.
गेल्या आठवड्यात सीबएस आणि यू गव्हर्मेंटने केलेल्या सर्वेक्षणात कमला हॅरिस आघाडीवर आहेत. ट्रम्प हॅरिसपेक्षा तीन गुणांनी आणि बायडेन पाच गुणांनी (५२%-४७%) पुढे होते. जुलैमध्ये इकॉनॉमिस्ट आणि यू गव्हर्मेंटच्या सर्वेक्षणानुसार कमला हॅरिस या ट्रम्प यांच्याकडून काही गुणांनी पराभूत होऊ शकतात. त्या निवडणुकीत ४१ ते ४३ टक्क्यांनी वाईट कामगिरी करतील. अगदी अलीकडे, ट्रम्प यांच्यावरील गोळीबाराच्या प्रयत्नानंतर केलेल्या रॉयटर्सच्या सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की, बायडेन आणि हॅरिस ट्रम्प यांच्या बरोबरीने आहेत.
परंतु, ६९ टक्के लोकांना असे वाटते की बायडेन यांचे वय झाल्याने सरकार चालवू शकणार नाहीत. पेनसिल्व्हेनिया आणि व्हर्जिनियाच्या नव्या न्यूयॉर्क टाईम्स/सीएनएन कॉलेज पोलमध्ये, कमला हॅरिस यांनी जो बायडेन यांना २ गुणांनी मागे टाकले. एनबीसीच्या पोलमध्ये हॅरिस यांच्या बाजूने सर्वाधिक कल दिसत आहे. आपल्या भारतीय वारशासाठी ओळखल्या जाणाऱ्या उपराष्ट्रपतींनी कृष्णवर्णीय मतदारांमध्ये लक्षणीय प्रभाव पाडला असून, बायडेन यांच्या ५७ गुणांच्या आघाडीच्या तुलनेत ट्रम्प यांना तब्बल ६४ गुणांनी आघाडी मिळाली आहे. फोर्ब्सच्या म्हणण्यानुसार, एका डेमोक्रॅटिक पोलिंग फर्मच्या सर्वेक्षणानुसार हॅरिस ९ जुलै रोजी झालेल्या मतदानात माजी राष्ट्रपतींपेक्षा ४१ ते ४२ टक्क्यांनी आघाडीवर आहेत.