संग्रहित छायाचित्र
वॉशिंग्टन: माझ्या आजोबांना देशाची वेगळी छटा निर्माण करायची आहे. माध्यमांमुळे माझे आजोबांची वेगळी प्रतिमा तयार झाली आहे. पण ते कसे आहेत हे आम्हाला माहिती आहे. ते खूप काळजी घेणारे आणि प्रेमळ आहेत. त्यांना खरेच या देशाला सर्वोत्तम बनवायचे आहे. ते अमेरिकेला पुन्हा महान बनवण्यासाठी प्रत्येक दिवस लढत राहतील, असा विश्वास माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची नात काई ट्रम्प यांनी व्यक्त केला आहे.
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला होता. पेनसिल्व्हेनियातील निवडणुकीच्या प्रचार रॅलीत त्यांच्यावर गोळीबार झाला. परंतु, ही गोळी त्यांच्या कानाला चाटून गेल्याने ते किरकोळ जखमी झाले, तर या हल्ल्यात सुरक्षा यंत्रणांनी केलेल्या प्रतिहल्ल्यात हल्लेखोराचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, यावरून डोनाल्ड ट्रम्प यांच्या नातीने या हल्ल्याबद्दल खेद व्यक्त केला आहे. काई ट्रम्प त्यांच्यासाठी आयोजित केलेल्या प्रचारसभेत बोलत होती.
गेल्या अनेक वर्षांपासून काई ट्रम्प सातत्याने डोनाल्ड ट्रम्प यांच्या बाजूने उभी राहिली आहे. ट्रम्प गोल्फ कोर्सचे उद्घाटनासारख्या कार्यक्रमांमध्येही ती दिसली आहे. १७ वर्षीय काई ट्रम्प म्हणाली की, पेनसिल्व्हेनियातील निवडणूक रॅलीदरम्यान आजोबांना गोळ्या घालण्यात आल्याचे लक्षात आले तेव्हा मला धक्का बसला, पण ते सुखरूप आहेत हे मला जाणून घ्यायचे होते. बऱ्याच लोकांनी माझ्या आजोबांना त्रास दिला आहे, परंतु तरीही ते उभे आहेत. माझे आजोबाही इतर आजोबांप्रमाणे असून ते आम्हाला कँडी आणि सोडा द्यायचे. माझ्या आजोबांना देशाची वेगळी छटा निर्माण करायची आहे. माध्यमांमुळे माझे आजोबांची वेगळी प्रतिमा तयार झाली आहे. पण ते कसे आहेत हे आम्हाला माहिती आहे. ते खूप काळजी घेणारे आणि प्रेमळ आहेत. त्यांना खरेच या देशाला सर्वोत्तम बनवायचे आहे. ते अमेरिकेला पुन्हा महान बनवण्यासाठी प्रत्येक दिवस लढत राहतील. आम्ही शाळेत कसे आहोत हे त्यांना नेहमी जाणून घ्यायचे असते, असेही तिने नमूद केले.
आजोबा त्यांच्या व्यस्त दिनक्रमातही आमची चौकशी करतात. आमच्या प्रकृतीविषयी चौकशी करून आमच्या करिअरसाठी आम्हाला प्रोत्साहन देतात. ती पुढे म्हणाली की, आजोबा, तुम्ही आमच्यासाठी फार प्रेरणादायी असून माझे तुमच्यावर फार प्रेम आहे. दरम्यान डोनाल्ड ट्रम्प हे पेनासेल्वेनिया या ठिकाणी ट्रूथ सोशल प्लॅटफॉर्मवर बोलत होते. त्याचवेळी त्यांच्यावर गोळीबार झाला. ही गोळी त्यांच्या कानाला चाटून गेली. अशात तातडीने ट्रम्प हे खाली वाकले. त्यानंतर सिक्रेट सर्व्हिसचे सुरक्षा रक्षक त्यांच्या भोवती आले. त्यांच्या भोवती कडे करून त्यांना या ठिकाणाहून बाजूला करण्यात आले. त्यानंतर जो हल्लेखोर होता त्यालाही ठार करण्यात आले. या घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला. ट्रम्प यांनी त्याबाबत संवेदना व्यक्त केली आहे.
डोनाल्ड ट्रम्प पुन्हा निशाण्यावर?
मिलवॉकी येथे नॅशनल रिपब्लिकन कन्व्हेंशनचे आयोजन करण्यात आले. यावेळी रिपब्लिकन पक्षाकडून ट्रम्प यांची अध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून निवड करण्यात आली. पण या कन्व्हेशनदरम्यान दोन धक्कादायक घटना समोर आल्या. यावेळी पोलिसांनी कार्यक्रम आयोजित केलेल्या ठिकाणावरून एका २१ वर्षीय तरुणाला अटक केली. हा व्यक्ती या कन्व्हेंशनमध्ये सहभागी होण्यासाठी जात होता. त्यावेळी पोलिसांना संशय आल्याने त्यांनी त्याला रोखले. या तरुणाने तोंडावर मास्क लावला होता. त्यासोबतच त्याच्याकडे एक मोठी बॅगही होती. यामुळे पोलिसांनी त्याची झाडाझडती घेतली असता त्याच्या बॅगेत एके-५७ रायफल आणि गोळ्या आढळल्या आहेत.