प्रसिद्ध प्राणिशास्त्रज्ञ ॲडम ब्रिटन यांनी श्वानांवरही केले बलात्कार; २४९ वर्षांची होणार शिक्षा

प्रसिद्ध प्राणिशास्त्रज्ञ ॲडम ब्रिटन यांनी माणुसकीला काळीमा फासणारे अतिशय किळसवाणे कृत्य केल्याचे समोर आले आहे. त्यांना न्यायालयाने २४९ वर्षांची शिक्षा सुनावली आहे. प्राणी अत्याचाराचे एकूण ६० गुन्हे त्यांच्यावर दाखल असून त्यात ४९ श्वानांचा खून केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Edited By Admin
  • Tue, 16 Jul 2024
  • 11:46 am
world news,  Adam Britton,  famous zoologist, london, disgusting act,  humanity

संग्रहित छायाचित्र

किळस‌वाण्या कृत्याचे ६० गुन्हे, 

लंडन : प्रसिद्ध प्राणिशास्त्रज्ञ ॲडम ब्रिटन यांनी माणुसकीला काळीमा फासणारे अतिशय किळसवाणे कृत्य केल्याचे समोर आले आहे. त्यांना न्यायालयाने २४९ वर्षांची शिक्षा सुनावली आहे. प्राणी अत्याचाराचे एकूण ६० गुन्हे त्यांच्यावर दाखल असून त्यात ४९ श्वानांचा खून केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. एवढेच नाही तर या कृत्याचे त्यांनी व्हीडीओ रेकॉर्डिंगही केले होते. इंग्लंडमधील ‘मिरर’ ने दिलेल्या बातमीनुसार श्वानांवर बलात्कार, छळ आणि खुनाचा आरोप ब्रिटन यांच्यावर असून ऑस्ट्रेलियात त्यांना २४९ वर्षांची शिक्षा झाली आहे. 

ऑस्ट्रेलियाच्या एनटी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश मायकल ग्रँट यांनी हा निकाल दिला. ते म्हणाले, मुक्या प्राण्यांवर अतिशय विकृत अत्याचार झालेले आहेत.  न्यायालयाने अंतिम निकाल देण्यापूर्वी ब्रिटन यांच्या वकिलाने न्यायालयासमोर नवे पुरावे सादर केले आणि त्याचा विचार करण्याची मागणी केली. तुरुंगात असताना ब्रिटन यांच्यावर ३० तास समुपदेशन करण्यात आले होते. समुपदेशकाचा अहवाल विचारात घ्यावा, अशी वकिलांची मागणी होती. प्राणिशास्त्रज्ञ ॲडम ब्रिटन यांनी ऑस्ट्रेलियातील डार्विन शहरातील आपल्या घरात श्वानांची छळछावणी उभारली होती. या छावणीत ते श्वानांचा विकृत छळ करून त्यांना हालहाल करून मारत असत. या विकृतीचे त्यांनी व्हीडीओ रेकॉर्डिंगही केले. तसेच एका शिपिंग कंटेनरमध्ये त्यांनी ही छावणी तयार केली होती. तिथे ते श्वानांवर लैंगिक अत्याचार करत असत. 

प्राणिशास्त्रज्ञ ब्रिटन हे मगर प्रजातीचे तज्ज्ञ आहेत. त्यांच्यावर पशू अत्याचाराचे आठ गुन्हे दाखल आहेत. ज्यामध्ये त्यांना प्रत्येकी तीन वर्षांची शिक्षा होऊ शकते. बाल शोषणाशी संबंधित सामग्री बाळगणे आणि त्याचे वितरण करण्याचे चार गुन्हे आहेत, ज्यामध्ये कमीत कमी १० वर्षांची शिक्षा होऊ शकते. तसेच ३७ गुन्हे प्राण्यांवरील विकृत अत्याचाराचे दाखल आहेत. त्यात प्रत्येकी पाच वर्षांची शिक्षा होऊ शकते.

प्राण्यांकडे लैंगिकदृष्ट्या आकर्षित होणाऱ्या मानवी प्रवृत्तीसाठी झूफिलिया हा शब्द वापरला जातो. बेस्टीयालिटी हा शब्द प्राण्यांवर होणाऱ्या बळजबरीकरता वापरला जातो. आज बहुतेक देशांमध्ये प्राण्यांशी लैंगिक संबंध असलेली पोर्नोग्राफी दाखविणे बेकायदेशीर आहे. जगभरात प्राणी आणि मानव यांच्यातील लैंगिक संबंधांच्या विरोधात अनेक कायदे आहेत. असे असले तरी ज्या देशांमध्ये झूफिलिया या प्रकारावर बंदी नाही, अशा ठिकाणी पोर्नोग्राफीचे चित्रण केले जाते. ब्रिटन यांच्यावर बेस्टीयालिटी प्रकरणी गुन्हे दाखल झाले असून त्यांच्या मानसिक स्थितीचा अभ्यास केला जात आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest