संग्रहित छायाचित्र
न्यूयॉर्क: एफ-१५, एफ-१६, एफ-१८, एफ-३५, एफ-२२ या श्रेणीतील लढाऊ विमाने असोत अथवा बी-१बी , बी-५२, बी-२१ हे बॉम्बवर्षाव करणारी विनाशक विमाने, तुम्ही फक्त नाव घ्या, अमेरिका आपल्या सर्व लढाऊ विमानांमध्ये नवीन हायपरसॉनिक क्षेपणास्त्र बसवणार आहे. या क्षेपणास्त्राचे नाव आहे, मॅको. लॉकहीड मार्टिनने हे क्षेपणास्त्र विकसित केले आहे. या क्षेपणास्त्राला मल्टी-मिशन वेपन म्हटले जाते.
हे क्षेपणास्त्र समुद्र, हवा, एयर डिफेंस सिस्टमवर हल्ला करण्यास सक्षम आहे. अमेरिकेने आपले सर्व फायटर जेट्स, बॉम्बवर्षक विमान आणि टेहळणी विमानांमध्ये या क्षेपणास्त्राची चाचणी केली आहे. एफ-१८ सुपर हॉर्नेट आणि एफ-१५ मध्येही हे क्षेपणास्त्र फिट होऊ शकते. एफ-२२ रॅप्टर आणि एफ-३५ लाइटनिंग-२ मध्येसुद्धा हे क्षेपणास्त्र बसवले जाणार आहे. त्याशिवाय अमेरिकेच्या बॉम्बवर्षक विमानातही फिट केले जाईल. यामुळे अमेरिकन फायटर जेट्सची ताकद कैकपटीने वाढणार आहे.
हे अत्याधुनिक धोकादायक क्षेपणास्त्र अमेरिकेच्या चौथ्या पिढीच्या फायटर जेट्सपासून पाचव्या आणि सहाव्या पिढीच्या स्टेल्थ फायटर एयरक्राफ्ट्समधूनही डागता येईल. हे क्षेपणास्त्र हवेतून लॉन्च करता येईल. म्हणजे कुठल्याही फायटर जेटमधून डागता येईल. ५९० किलोग्रॅम वजनाच्या या क्षेपणास्त्रात १३० किलोग्रॅम वॉरहेड फिट करता येऊ शकते. १३ फूट लांब आणि १३ इंच व्यासवाल्या या क्षेपणास्त्राच्या सॉलिड रॉकेट मोटर आहे. ज्यामुळे या क्षेपणास्त्राला ६३०० किलोमीटर प्रतितास गती मिळते.
या घातक अस्त्राबद्दल झाला खुलासा
एप्रिल महिन्यात या क्षेपणास्त्राबद्दल खुलासा करण्यात आला. मेरीलँड या संरक्षण प्रदर्शनात हे क्षेपणास्त्र प्रथमच दाखवण्यात आले. अमेरिकन एअर फोर्सनंतर अमेरिकन नौदलानेही या क्षेपणास्त्राचा वापर करावा, अशी लॉकहीड मार्टिनची इच्छा आहे. पाणबुडी आणि युद्धनौकेवरून लॉन्च होणाऱ्या मॅको क्षेपणास्त्राचा व्हेरिएन्ट बनवण्यात येत आहे.
फायटर जेटसोबत विध्वंसक क्षेपणास्त्र
मॅको क्षेपणास्त्राद्वारे रशिया आणि चीनच्या प्रशांत महासागरातील एंटी-एक्सेस आणि एरिया डिनायल (ए२ /एडी) शस्त्र, यंत्र नष्ट करता येऊ शकतात. आतापर्यंत जी हायपरसॉनिक क्षेपणास्त्रे होती, ती आकाराने मोठी होती. मॅको हे क्षेपणास्त्र आकारने छोटे आणि दमदार आहे. वजनाने हे हलके क्षेपणास्त्र आहे. आधीच घातक अशा फायटर जेटसोबत आता विध्वंसक क्षेपणास्त्र जोडले जाणार असल्याने रशिया आणि चीनच्या दहशतीत वाढ होणार आहे. कुठल्याही एयर डिफेंस सिस्टिमकडे या क्षेपणास्त्राचा प्रतिकार करण्याची क्षमता नाही.