File Photo
ओटावा : सध्या कॅनडामध्ये लिबरल पार्टी ऑफ कॅनडा या पक्षाचे सरकार सत्तेवर आहेत. सध्या, कॅनडाच्या संसदेच्या हाउस ऑफ कॉमन्समध्ये एकूण ३३८ जागांपैकी लिबरल पार्टीकडे १५३ खासदारांचे बहुमत आहे. या पक्षाचे नेते पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांना सध्या पक्षांतर्गत बंडखोरीला सामोरे जावे लागत आहे. त्यांना पक्षातून अंतर्गत विरोध होत आहे.
या महिन्याच्या सुरुवातीला, ट्रुडो सरकारचा सहयोगी न्यू डेमोक्रॅटिक पार्टी (एनडीपी) ने आपला पाठिंबा काढून घेतला होता. तेव्हापासून ट्रुडो बहुमताशिवाय सरकार चालवत आहेत. एनडीपी हा खलिस्तान समर्थक कॅनडाचे शीख खासदार जगमीत सिंग यांचा पक्ष आहे.
लिबरल पक्षाच्या खासदारांनी ट्रुडो यांना पंतप्रधानपदाचा राजिनामा देण्यासाठी २८ ऑक्टोबरपर्यंत वेळ दिला आहे. ट्रुडोंच्या राजकारणाला वैतागलेल्या खासदारांनी ट्रुडोंना एकतर पायउतार व्हा किंवा बंडखोरीला सामोरे जाण्यास तयार राहा अशी धमकीच दिली आहे.जस्टीन ट्रुडो सलग तीन टर्म सत्तेमध्ये आहेत. आणि यावेळी ते चौथ्यांना निवडणूकिला सामोरे जात आहे. परंतु कॅनडाच्या मागील शंभर वर्षांच्या इतिहासात कॅनडाच्या सत्तेत असलेल्या पक्षाने अथावा नेत्याने एकदाही चौथी निवडणूक जिंकलेली नाही.
वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, ट्रुडो यांच्या लिबरल पार्टीच्या २४ खासदारांनी निवडणुकीपूर्वी पंतप्रधानांना हटवण्याची मागणीच्या पत्रावर स्वाक्षरी केली आहे. परंतु खासदारांची स्वाक्षरी असलेले हे मागणीपत्र अद्याप सार्वजनिक करण्यात आलेले नाही. या पत्रात खासदारांनी ट्रुडो यांना पुढील वर्षी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत पराभवाचा धोका लक्षात घेऊन निवडणुकीपूर्वी राजीनामा देण्याची मागणी केली आहे.
खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येवरून त्यांचे सरकार भारतासोबत मोठ्या राजनैतिक तणावात अडकले असताना ट्रूडोंसमोर हे आव्हान आले आहे.एनडीपीचे खलिस्तान समर्थक नेते जगमीत सिंग यांनी ट्रूडो सरकारचा पाठिंबा काढून घेतला होता.बंडखोर खासदारांच्या म्हणण्यानुसार जस्टीन ट्रुडो यांनी बायडेनसारखा दावा सोडावा.पंतप्रधान ट्रूडो यांनी बुधवारी बंद दारा आड २० लिबरल पक्षाच्या खासदारांचीही भेट घेतली. या बैठकीत लिबरल पक्षाचे ब्रिटिश कोलंबियाचे खासदार पॅट्रिक व्हीलर म्हणाले की, पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुका जिंकण्यासाठी पंतप्रधानांचा राजीनामा आवश्यक आहे.
कॅनडातही कमला हॅरिस पॅटर्न
व्हीलर पुढे असेही म्हणाले की, अमेरिकेत बायडेन यांच्या नेतृत्वाखाली डेमोक्रॅटिक पक्ष निवडणुकीत खूप मागे होता. यानंतर त्यांनी दावा सोडून कमला हॅरिस यांचे नाव पुढे केले. त्यामुळे डेमोक्रॅटिक पक्षाची आघाडी मजबूत झाली. ते म्हणाले की लिबरल पक्ष कॅनडामध्येही त्याच पद्धतीने पुनरागमन करू शकतो.
केन मॅकडोनाल्ड, न्यूफाउंडलँड, कॅनडाचे लिबरल खासदार म्हणाले की, ट्रुडो यांनी लोकांचे ऐकणे आवश्यक आहे. ते म्हणाले की त्यांचे अनेक सहकारी आहेत जे आगामी निवडणूक लढवू पाहत आहेत, परंतु कमी मतदान संख्या आणि लिबरल लोकांच्या घसरत्या लोकप्रियतेमुळे ते घाबरले आहेत.