सातासमुद्रापार 'रामनामा'चा जयघोष; दुबईमध्ये प्रथमच साजरा झाला श्रीराम नवमी उत्सव

पुणे : मर्यादापुरूषोत्तम श्रीरामांचा जन्म चैत्र शुक्ल नवमीला दुपार‍ी बारा वाजता कडक उन्हाच्या प्रहारात झाला होता. लोक रामजन्मोत्सव धुमधडाक्यात साजरा करतात. विकार, विचार आणि व्यावहारीक कार्यात त्यांनी मर्यादा सोडली नाही म्हणून त्यांना 'मर्यादा पुरूषोत्तम' असे म्हटले जाते.

दुबईमध्ये प्रथमच साजरा झाला श्रीराम नवमी उत्सव

१४ एप्रिलला पार पडला उत्सव

पुणे : मर्यादापुरूषोत्तम श्रीरामांचा जन्म चैत्र शुक्ल नवमीला दुपार‍ी बारा वाजता कडक उन्हाच्या प्रहारात झाला होता. लोक रामजन्मोत्सव धुमधडाक्यात साजरा करतात. विकार, विचार आणि व्यावहारीक कार्यात त्यांनी मर्यादा सोडली नाही म्हणून त्यांना 'मर्यादा पुरूषोत्तम' असे म्हटले जाते. त्याच प्रभू श्रीराम चंद्राचा जन्मोत्सव यंदा प्रथमच दुबई मधील सर्व भारतीय बांधवानी एकत्र येऊन सातासमुद्रा पार श्रीराम नवमी उत्सवाचे आयोजन करून केले.

'दूर्लभं भारते जन्म' ज्या भूमीत जन्म दुर्लभ आहे, त्या भूमीत जन्म मिळाल्यावरच तेथील महानता समजेल? म्हणून रामनवमीच्या निमित्ताने राम चरित्र समजावून ते अंगीकारण्याचा आपला प्रयत्न असला पाहिजे या अश्या संकल्पनेने श्री राम नवमी चे आखातामधील यूएई मध्ये १४ एप्रिल २०२4 रोजी आयोजन यंदा करण्यात आले. या भव्य आयोजनाचे हे १ ले वर्ष होते. हे आयोजन दुबईतील ग्लॅण्डले इंटरनॅशनल स्कूल दुबई याठिकाणी करण्यात आले.आखातात स्थायिक झालेल्या नवीन पिढीला आपल्या भारतीय देदिप्यमान,अध्यामिक व इतिहासाची ओळख करून देण्यासाठी आतापर्यंत अनेक सामाजिक कार्यक्रम पार पाडणाऱ्या ईन्स्पायर इव्हेंट्स युएई यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले

या कार्यक्रमा अंतर्गत भारताची परंपरा, नृत्य, भजन यासारखे विविध्यपूर्ण कार्यक्रम आंतरराष्ट्रीय पातळीवर सादर करण्यात आले. ज्यात मराठी, गुजराती, गोवन, हिंदी, तेलगू व मल्याळम समुदायातील लोकांनी एकत्र येऊन सादरीकरण केले व या कार्यक्रमाची शोभा वाढवली. श्रीमंत ढोल ताशा पथक दुबई व श्री गणेश भजन मंडळ शारजाह यांच्या सहकार्यानी श्री राम प्रभू यांची भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली.  

या कार्यक्रमास यूएईमधील इसकॉन, स्वामी समर्थ मंडळ, श्री गणेश भजन मंडळ गोवा दुबई, इंटरनॅशनल सद्गुरू फौंडेशन, साधनंम ग्रुप  व इतर उद्योजक व समाजसेवी संघटनांनी सहकार्य केले व सागर जाधव ( एस.जे.लाईव ) यांनी हा कार्यक्रम फेसबुक लाईव माध्यमातून जगातील सर्व प्रभू रामभक्तां पर्यंत पोहोचवला.रामायणवर आधारित विविध भाषां मधील भजन, वेशभूषा, नाट्य, केरल मधील चेंडा मेलंम व श्रीमंत ढोल ताशा पथक यूएई चे वादन हे कार्यक्रमाचे खास आकर्षण ठरले.

या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी आयोजक चंद्रशेखर जाधव, चैताली जाधव, विठोबा अहिरे, रमा काळे, दुर्गेश काळे, दीपा भरत व सहकारी पल्लवी बारटके, सुप्रिया, संदीप पवार, प्रशांत शिंपी, संदीप शिंपी, संतोष भस्मे, डॉ. स्वप्नील, डॉ. सीमा उपाध्याय, शिवाजी नरूने, मंदार कुलकर्णी, किशोर मुंडे, प्रवीण जोगळे, मार्तंड मांजेलकर व इतर सर्व सहकाऱ्यांनी  अथक मेहनत घेऊन भव्य श्रीराम नवमी साजरी केली व सातासमुद्रा पार रामनामाचा गजर व जयघोष केला.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest