कॅनडाने भारताच्या पाठीत खंजीर खुपसला संजय वर्मांचे कॅनडाच्या भारतविरोधी भूमिकेवर टीकास्र

भारताचे कॅनडामधील माजी उच्चायुक्त संजय वर्मा यांनी पीटीआय ला दिलेल्या मुलाखतीमध्ये कॅनडावर खळबळजनक आरोप केले. संजय वर्मा यांनी कॅनडाच्या वागणुकीवर आक्षेप घेत कॅनडाने भारताच्या पाठीत खंजीर खुपसल्याचा गंभीर आरोप केला.

संजय वर्मा यांनी कॅनडावर आरोप केले

नवी दिल्ली  : भारताचे कॅनडामधील माजी उच्चायुक्त संजय वर्मा यांनी पीटीआय ला दिलेल्या मुलाखतीमध्ये कॅनडावर खळबळजनक आरोप केले. संजय वर्मा यांनी कॅनडाच्या वागणुकीवर आक्षेप घेत कॅनडाने भारताच्या पाठीत खंजीर खुपसल्याचा गंभीर आरोप केला. त्याबरोबरच कॅनडाने भारताला अत्यंत अव्यावसायिक पद्धतीने वागवल्याचेही म्हटले आहे.

बुधवारी (दि.२३) ‘पीटीआय’शी विविध मुद्द्यांवर बोलताना वर्मा यांनी कॅनडातील खलिस्तानी चळवळीची उत्पत्ती त्याबरोबरच स्थानिक राजकारण्यांकडून निवडणुकीतील फायद्यासाठी मिळत असलेला पाठिंबा या विषयांवर सविस्तर चर्चा केली. खलिस्तानी आपली संख्या वाढवण्यासाठी गुन्हेगारी कारवाया करतात, असा आरोपही त्यांनी केला

संजय वर्मा आयआयटीचे पदवीधर आणि अणुशास्त्रज्ञ असलेले वर्मा यांनी यापूर्वी जपान आणि सुदानमध्ये भारताचे राजदूत म्हणून काम केले आहे. दोन देशांमधील संबंध बिघडल्यानंतर कॅनडाने १३ ऑक्टोबर रोजी वर्मा यांचे हरदीप सिंग निज्जरच्या हत्येशी संबंध असल्याचा आरोप केला होता.

कॅनडाने पुढील कारवाई करण्यापूर्वी भारताने वर्मा आणि इतर पाच मुत्सद्दींना परत बोलावले. कॅनडातील भारतीय विचारधारेला खलिस्तानच्या मूठभर समर्थकांनी गुन्हेगारीत रूपांतरित केले आहे. कॅनडामध्ये बंदुक चालवणे आणि मानवी तस्करीचे प्रकार सर्रास होतात. तरीही कॅनडातील अधिकारी त्याकडे डोळेझाक करतात. ‘मतपेढी’ हे त्यामागे एकमेव कारण असल्याचे वर्मा यांनी मुलाखतीत म्हटले आहे.

द्विपक्षीय संबंधांसाठी कॅनडाचा हा सर्वांत अव्यावसायिक दृष्टीकोन आहे. दोन्ही देशांमधील संबंध मोठे आहेत, असे त्यांना वाटत असेल, तर हा मुद्दा हाताळण्यासाठी त्यांच्याकडे इतर राजनैतिक साधने उपलब्ध आहेत आणि त्या साधनांचा वापर हे संबंध कायम ठेवण्यासाठी केला जाऊ शकतो, असे वर्मा यांनी सांगितले.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest