आरक्षणावरून बांगलादेश तापला !

आरक्षणाच्या प्रश्नांवरून भारतातील वातावरण तापत असताना शेजारच्या बांगलादेशातही आरक्षणावरून वातावरण पेटत आहे. बांगलादेशात दोन गटांत सरकारी नोकऱ्यांतील आरक्षणावरून हाणामारी झाली आहे. आरक्षण हा मुद्दा बांगलादेशातही चर्चेत आहे. आरक्षणावरून झालेल्या हाणामारीत अनेकजण जखमीही झाले आहेत.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Wed, 17 Jul 2024
  • 02:42 pm
world news, bangla desh,  reservation, clash over the reservation, government jobs,

संग्रहित छायाचित्र

सरकारी नोकऱ्यांतील आरक्षणावरून विद्यापीठाबाहेर विद्यार्थ्यांचे दोन गट आमने-सामने, अनेकजण जखमी, पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या 

आरक्षणाच्या प्रश्नांवरून भारतातील वातावरण तापत असताना शेजारच्या बांगलादेशातही आरक्षणावरून वातावरण पेटत आहे. बांगलादेशात दोन गटांत सरकारी नोकऱ्यांतील आरक्षणावरून हाणामारी झाली आहे. आरक्षण हा मुद्दा बांगलादेशातही चर्चेत आहे. आरक्षणावरून झालेल्या हाणामारीत अनेकजण जखमीही झाले आहेत.

आरक्षणाच्या प्रश्नावरून ढाका येथील जहांगीरनगर विद्यापीठाबाहेर विद्यार्थी एकमेकांना भिडले. ही परिस्थिती इतकी हाताबाहेर गेली की शेवटी पोलिसांना अश्रुधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या आणि गर्दी पांगवावी लागली.

या सगळ्या झटापटीत आणि हाणामारीच्या घटनेत अनेक विद्यार्थी जखमी झाले आहेत. सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण हवे, या मागणीवरून विद्यार्थ्यांच्या दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. सरकारच्या बाजूने असलेल्या विद्यार्थ्यांची संघटना आणि चळवळ करणाऱ्या विद्यार्थ्यांची संघटना असे विद्यार्थी जहांगीरनगर विद्यापीठाच्या बाहेर एकमेकांना भिडले. यामध्ये डझनभर विद्यार्थी जखमी झाल्याची माहिती बांगलादेश पोलिसांनी दिली.

बांगलादेशच्या १९७१ च्या स्वातंत्र्ययुद्धात ज्यांनी योगदान दिलं आहे, त्यांच्या कुटुंबातील मुलांना सरकारी नोकरी मिळाली पाहिजे, अशी मागणी काहीजण करत आहेत. तसेच महिला, अपंग व्यक्ती आणि अल्पसंख्याकांना सगळ्यांना सरकारी नोकरीत आरक्षण मिळावं ही मागणीही केली जाते आहे. २०१८ मध्ये या सगळ्याला स्थगिती देण्यात आली होती. आता पुन्हा एकदा या सगळ्या वर्गांना आरक्षण दिले जावे, अशी मागणी होते आहे. याच मुद्द्यावरून दोन गटांमध्ये हाणामारी झाली.

ज्येष्ठ नागरिकांच्या वंशजांसाठी ३० टक्के आरक्षण असावं अशीही मागणी करण्यात आली आहे. बांगलादेश न्यायालयात हा मुद्दा पोहोचला. बांगलादेश उच्च न्यायालयाने आरक्षणाच्या बाजूने निकाल दिला. मात्र, आता अपंग आणि युद्धात जे शहीद झाले त्यांच्या वंशजांना ६ टक्के आरक्षण मिळावं अशी मागणी होते आहे. हा मुद्दा ताजा असल्याने यावरूनच हाणामारी झाल्याचे सांगण्यात येत आहे. दुसरीकडे बांगलादेश सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या आरक्षणासंबंधीच्या निर्णयाला चार आठवड्यांची स्थगिती दिली आहे. चार आठवड्यांनंतर आम्ही याबाबतचा निर्णय घेऊ असं कोर्टाने म्हटले आहे.

त्यानंतर बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनीही हा मुद्दा आता सर्वोच्च न्यायालयाच्या दारात असल्याचे स्पष्ट केलं. ही सगळी परिस्थिती असली तरीही ढाका शहरात आरक्षणाचा मुद्दा पेटलेला असल्याचे पाहण्यास मिळाले. तासन् तास हिंसाचार सुरू राहिल्याने जहांगीरनगर विद्यापीठ परिसर भागातल्या ५० हून अधिक जखमींवर उपचार करण्यात आले. वैद्यकीय अधिकारी अली बिन सोलेमन यांनी ही माहिती दिली.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest