हिज्बुल्लाहचा आणखी मोठा हल्ला, तीनशेपेक्षा जास्त क्षेपणास्त्रांचा मारा; इस्राएलमध्ये आणीबाणी

जेरुसलेम: हिजबुल्लाहने इस्राएलवर हल्ला केला आहे. हिजबुल्लाहने ३०० हून अधिक क्षेपणास्त्र इस्राएलवर डागले आहेत. इस्राएलच्या सैन्याने केलेल्या हल्ल्याच्या प्रत्युत्तरादाखल हिजबुल्लाहने हा हल्ला केला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Mon, 26 Aug 2024
  • 01:18 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

जेरुसलेम: हिजबुल्लाहने इस्राएलवर हल्ला केला आहे. हिजबुल्लाहने ३०० हून अधिक क्षेपणास्त्र इस्राएलवर डागले आहेत. इस्राएलच्या सैन्याने केलेल्या हल्ल्याच्या प्रत्युत्तरादाखल हिजबुल्लाहने हा हल्ला केला आहे.  हिजबुल्लाहच्या या हल्ल्यापासून लेबनॉनच्या सीमेला लागून असलेल्या इस्राएलच्या हद्दीत सायरनचे आवाज सतत ऐकू येत आहेत. या हल्ल्यानंतर इस्राएली लष्कराने संपूर्ण इस्राएलमध्ये आणीबाणी लागू केली आहे. तत्पूर्वी, रविवारी पहाटे इस्राएलने लेबनॉनच्या सीमेत घुसून हिजबुल्लाहच्या ठाण्यांना लक्ष्य केले होते.

यापूर्वी इस्राएलचे लष्कर लेबनानमधील इराण समर्थनार्थ संघटना हिजबुल्लाहच्या ठिकाणांवर हल्ला केला होता आणि तेथील १०० हून अधिक ठिकाणांवर निशाणा साधला होता. लेबनानच्या हवाई हल्ल्याचे उत्तर देताना हा हल्ला करण्यात आला होता. त्यानंतर हिजबुल्लाहने इस्राएलवर मोठा हल्ला केला. यावेळी हिजबुल्लाहने तब्बल ३०० हून अधिक क्षेपणास्त्र डागल्याची माहिती आहे.

परिणामी इस्राएलचे संरक्षणमंत्री योव गॅलंट यांनी पुढील ४८ तासांसाठी इस्राएलमध्ये आणीबाणी घोषित केली आहे. त्याशिवाय पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी या परिस्थितीला उत्तर देण्यासाठी उच्चस्तरीय बैठक बोलावली. गेल्या अनेक महिन्यांपासून इस्राएल आणि हिजबुल्लाहमधील तणाव वाढत होता. व्हाईट हाऊसचे राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे प्रवक्ते सीन सॅवेट यांनी याबाबत सांगितले की, अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडन हे  इस्राएल आणि लेबनॉनमधील घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest