स्वित्झर्लंड : साईड मशिनचा वापर करून अमेरिकी महिलेची आत्महत्या

स्वित्झर्लंड आणि जर्मनच्या सीमेजवळ एक महिलेने सुसाईड मशिनचा वापर करून आत्महत्या केली. ही ६४ वर्षीय महिला अमेरिकेतील असून असा प्रकारे आपले आयुष्य संपवणारी ती जगातील पहिली व्यक्ती ठरली आहे.

Suicide,machine, Swiss-German border, 64-year-old woman, America, First person, Assisted suicide

बर्न  : स्वित्झर्लंड आणि जर्मनच्या सीमेजवळ एक महिलेने सुसाईड मशिनचा वापर करून आत्महत्या केली. ही ६४ वर्षीय महिला अमेरिकेतील असून असा प्रकारे आपले आयुष्य संपवणारी ती जगातील पहिली व्यक्ती ठरली आहे. आता या महिलेच्या मृत्यूनंतर स्वित्झर्लंडमध्ये अनेकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

स्वित्झर्लंड-जर्मन सीमेजवळ सोमवारी दुपारी थ्रीडी प्रिंटेड सुसाईड मशिनमध्ये या महिलेचा मृत्यू झाला. या मशिनला टेस्ला ऑफ युथेनेशिया (इच्छा मृत्यु) असेही म्हटले जाते. अखेरचा श्वास घेण्यापूर्वी या धोकादायक मशिनने एक संदेश दिला होता. त्यात मशीन म्हणाले, "मरायचं असेल तर हे बटण दाबा.

स्वित्झर्लंड हा जगातील अशा मोजक्या देशांपैकी एक आहे जिथे परदेशी लोकांना कायदेशीररित्या इच्छामृत्यूची परवानगी मिळू शकते. आरोग्यमंत्री एलिझाबेथ बॉम-श्नाइडर यांनी ही सुसाईड मशीन कायदेशीर नसल्याचे म्हटले आहे. सुरक्षा विषयक नियमांची हे मशीन पूर्तता करत नाही, त्यामुळे याचा वापर करू नये, असेही त्यांनी म्हटले होते. 

वादग्रस्त मशीनचे चेंबर नायट्रोजनने भरले जाते. मशिन सुरू होताच वापरकर्त्याची ऑक्सिजन पातळी धोकादायक पातळीवर खाली येते. पॉडच्या आतील व्यक्ती बेशुद्ध होते आणि सुमारे १० मिनिटांच्या आत तिचा मृत्यू होतो. या पॉडला आतूनच नियंत्रित केले जाऊ शकते. त्याच्या आतमध्ये आपत्कालीन एक्झिट बटण आहे. 'एक्झिट इंटरनॅशनल'शी संलग्न असलेल्या 'द लास्ट रिसॉर्ट' या संस्थेचे सहअध्यक्ष फ्लोरियन विलेट हे महिलेच्या मृत्यूचे एकमेव साक्षीदार होते.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest