संग्रहित छायाचित्र
जपानच्या दक्षिणेकडील किनारपट्टीला आज 7.1 रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का बसला. त्यानंतर जपानच्या सरकारी यंत्रणांनी दक्षिणेकडील क्युशू आणि शिकोकू या बेटांना त्सुनामीचा इशारा दिला आहे. जपानच्या हवामान संस्थेने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार जपानच्या दक्षिणेकडील किनारपट्टीला जवळपास एक मीटर उंचीच्या लाटांचा त्सुनामी धडकू शकतो.
सुमारे सव्वा कोटी लोकसंख्या असणाऱ्या जपान या देशात भूकंप काही नवीन नाही. जपान मध्ये दरवर्षी सुमारे दीड हजार वेळा भूकंप येतो. यातले बरचसे भूकंप हे सौम्य असतात. २०२४ वर्षीच्या सुरुवातीला जपानमध्ये असाच एक मोठा भूकंप झाला होता. या भूकंपामध्ये २६० लोक मरण पावले होते.
परंतु, जपानमध्ये नेहमीच भूकंप का येतात याचं कारण आपण जाणून घेऊया. जपानमध्ये नेहमीच भूकंप येण्याचं मुख्य कारण म्हणजे या देशाची भौगोलिक स्थिती. जपान हा देश रिंग ऑफ फायर या ज्वालामुखी आणि भूकंपाच्या प्रभावक्षेत्रात मोडतो. या भागात 400 पेक्षा जास्त जागृत ज्वालामुखी आहेत. या रिंग ऑफ फायर च्या प्रभावक्षेत्रात आल्यामुळे जपानमध्ये नेहमी भूकंप येतात.