संग्रहित छायाचित्र
बांगलादेश पंतप्रधान शेख हसीना यांच्या घरी नोकराचे काम करणाऱ्यांकडे २८४ कोटींची संपत्ती आढळून आले आहे. तो प्रवासासाठी खासगी हेलिकॉप्टर वापरतो आणि ‘ढाका ट्रिब्यून’च्या माहितीनुसार तो पाहुण्यांना पाणी द्यायचे काम करायचा. त्याचे नाव जहांगीर आलम असे असून हे प्रकरण प्रकाशात येण्याअगोदर तो अमेरिकेत पळून गेला आहे.
हसीनांच्या कार्यालयात, घरात काम करत असल्याचे सांगून अनेकांकडून जहांगीरने लाच घेतली होती. आता याबाबत पंतप्रधान हसिना यांनी तातडीने कारवाईचे आदेश दिले आहेत. बांगलादेशमध्ये माजी लष्करप्रमुख, पोलीस, कर अधिकारी, सरकारी कर्मचाऱ्यांच्या भ्रष्टाचाराशी संबंधित प्रकरणे समोर आली असून त्यात आलमचे नाव आहे.
पंतप्रधान हसीना म्हणाल्या, माझ्या घरी काम करणारी व्यक्ती आज करोडोंच्या मालमत्तेची मालक आहे. त्याने एवढा पैसा कुठून कमवला? एका सामान्य बांगलादेशी नागरिकाला एवढी मालमत्ता जमवायला १३ हजार वर्षे लागू शकतात. आम्ही गांभिर्याने चौकशी करत आहे.
जागतिक बँकेच्या म्हणण्यानुसार, १७ कोटी लोकसंख्या असलेल्या बांगलादेशाचे दरडोई उत्पन्न २ लाख ११ हजार आहे. आलम प्रकरण समोर आल्यावर विरोधकांनी सरकारला कोंडीत पकडले आहे.
बांगलादेशी नॅशनलिस्ट पार्टी (बीएनपी) चे प्रवक्ते वहिदुझ्झमन म्हणाले की, हसीनांच्या नोकराकडे एवढा पैसा आहे, मालकाकडे किती पैसे आहेत याचा अंदाज लावता येणार नाही. अजून सेवकाला अटक करण्यात आलेली नाही. त्याला नोकरीवरून काढले आहे. जानेवारीमध्ये पंतप्रधान हसिना चौथ्यांदा सत्तेवर आल्यापासून भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे समोर येत आहेत.देशाचे माजी राष्ट्रीय पोलीस प्रमुख बेनझीर अहमद यांची चौकशी सुरू आहे.
अमेरिकेने २०२१ मध्ये अहमदवर अनेक निर्बंधही लादले होते. माजी लष्करप्रमुख अझीझ अहमद यांच्यावरही भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. त्यानंतर लाचलुचपत विरोधी आयोगाने अझीझ यांच्या मालमत्ता जप्त करून बँक खातीही गोठवली आहेत.