संग्रहित छायाचित्र
अमेरिकेत प्रवेश केल्याप्रकरणी दर तासाला १० भारतीयांना अटक करण्यात आली होती. बेकायदेशीरपणे प्रवेशाची ही आकडेवारी गेल्या वर्षीची आहे. एका भारतीय एजन्सीच्या मते, सीमा ओलांडणारे 50% पेक्षा जास्त भारतीय गुजरातचे होते.
यूएस कस्टम्स अँड बॉर्डर प्रोटेक्शन विभागाने ऑक्टोबर २०२३ ते सप्टेंबर २०२४ या कालावधीतील लोकांचा डेटा जाहीर केला आहे. याच आकडेवारीनुसार २९ लाख लोकांना बेकायदेशीरपणे सीमा ओलांडल्याबद्दल अटक केली गेली. त्यापैकी ९० हजार ४१५ हे भारतीय होते. या ९० हजारांपैकी ४३ हजार ७६४ भारतीय अमेरिकेत कॅनडा मार्गे प्रवेश करताना अटक केली. म्हणजे एकूण बेकायदा प्रवेशाच्या जवळपास निम्मे लोक हे कॅनडाच्या सीमेवरून अमेरिकेत प्रवेश करताना पकडले गेले आहेत.
मात्र, मागील वर्षाच्या तुलनेत हा आकडा यंदा कमी झाला आहे. सन २०२२-२३ या वर्षात ९६ हजार ९१७ भारतीयांनी बेकायदेशीररित्या सीमा ओलांडली होती. या वर्षी कॅनडातून सीमा ओलांडणाऱ्या भारतीयांची संख्या आजपर्यंत सर्वाधिक होती.
मेक्सिको डंकी मार्गाऐवजी कॅनेडीय मार्गाला अधिक पसंती
कॅनडाच्या बॉर्डर क्रॉसिंग डेटावरून असे दिसून आले आहे की, भारतीय आता मेक्सिकोच्या अंधुक मार्गाऐवजी कॅनडाला त्यांची पहिली पसंती म्हणून वापरत आहेत. वास्तविक, अमेरिकेने मेक्सिको सीमेवर सतर्कता वाढवली आहे. त्याच वेळी, कॅनडाहून सीमा ओलांडणे मेक्सिकोपेक्षा सोपे आहे. कॅनडाचा व्हिसा घेतलेले भारतीय तेथून टॅक्सीने सीमा पार करून अमेरिकेत पोहोचतात. मात्र, अलीकडच्या काळात अमेरिकेने येथेही चेकपोस्ट कडक केले आहेत.
मात्र, वृत्तानुसार, कॅनडा सीमेवरून अटक करण्यात आलेल्या भारतीयांची संख्या सीमा ओलांडणाऱ्यांपेक्षा खूपच कमी आहे.
भारतातून अमेरिकेत पोहोचण्यासाठी एका बेकायदा प्रवाशाची म्हणजेच डंकीची सरासरी किंमत २० ते ५० लाख रुपये आहे. काही वेळा हा खर्च ७० लाख रुपयांपर्यंत पोहोचतो. या कामात गुंतलेले एजंट लोकांना वचन देतात की ते जितके जास्त पैसे देतात तितका त्रास कमी होईल.