संग्रहित छायाचित्र
रियाध : सौदी अरेबियामध्ये या वर्षी हज यात्राकाळात १३०० हून अधिक भाविकांचा मृत्यू झाला आहे. वाळवंटातील इस्लामिक पवित्र स्थळांवरील वाढत्या तापमानाने हे मृत्यू झाल्याचे सौदीच्या अधिकाऱ्यांनी रविवारी स्पष्ट केले. इजिप्तपाठोपाठ मृतांत इंडोनेशियातील १६५, भारतातील ९८ आणि जॉर्डन, ट्युनिशिया, मोरोक्को, अल्जेरिया आणि मलेशियामधील डझनभर यात्रेकरूंचा समावेश आहे. दोन अमेरिकी नागरिकांचाही मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.
सौदीचे आरोग्य मंत्री फहद बिन अब्दुररहमान अल-जलाजेल याबाबत म्हणाले की, १३०१ मृत्यूंतील ८३ टक्के यात्रेकरू अनधिकृत होते. हे यात्रेकरू मक्का आणि आसपास हज विधी पार पाडण्यासाठी वाढत्या तापमानातही चालत आले होते. सरकारी मालकीच्या वृत्तवाहिनीशी बोलताना ते मंत्री म्हणाले की, ९५ यात्रेकरूंवर रुग्णालयात उपचार केले जात आहेत. त्यातील काहींना राजधानी रियाधमध्ये उपचारांसाठी विमानाने नेण्यात आले. अनेक मृत यात्रेकरूंकडे ओळखीची कागदपत्रे नसल्याने ओळख प्रक्रियेला उशीर झाला. मृतांवर मक्का येथे अंतिम संस्कार करण्यात आले.
मृतांमध्ये ६६० हून अधिक इजिप्तच्या लोकांचा समावेश आहे. कैरोमधील माहितीनुासर यातीलल ३१ वगळता सर्व यात्रेकरू अनधिकृत होते. यामुळे इजिप्तने १६ ट्रॅव्हल एजन्सींचे परवाने रद्द केले आहेत. त्यांनी अनधिकृत यात्रेकरूंना सौदी अरेबियाला जाण्यास मदत केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
एका अधिकाऱ्यांनी सांगितले की, बहुतेक मृतांची नोंद मक्काच्या अल-मुईसेम परिसरातील कॉम्प्लेक्समध्ये झाली आहे. इजिप्तने यावर्षी ५० हजारांहून अधिक अधिकृत यात्रेकरूंना सौदी अरेबियाला पाठवले. सौदी अधिकाऱ्यांनी अनधिकृत यात्रेकरूंवर कारवाई केली आणि हजारो लोकांना बाहेर काढले. बहुतेक इजिप्तचे नागरिक, मक्का आणि आसपासच्या पवित्र स्थळी पायी पोहोचण्यात यशस्वी झाले. अधिकृत यात्रेकरूंप्रमाणे, त्यांच्याकडेही उष्णतेपासून बचाव करण्यासाठी हॉटेल नव्हते. मृतांत इंडोनेशियातील १६५, भारतातील ९८ आणि जॉर्डन, ट्युनिशिया, मोरोक्को, अल्जेरिया आणि मलेशियामधील डझनभर यात्रेकरूंचा समावेश आहे. दोन अमेरिकी नागरिकांचाही मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.
चेंगराचेंगरीत सर्वाधिक मृत्यू
ऐतिहासिकदृष्ट्या प्रसिद्ध असलेल्या हजमध्ये सातत्याने मृत्यू झाले आहेत. २ दशलक्षाहून अधिक लोक पाच दिवसांच्या तीर्थयात्रेसाठी सौदी अरेबियाला येतात. या यात्रेदरम्यान अनेकदा चेंगराचेंगरीही झाली आहे. अनेकदा साथीचे आजारही पसरले आहेत. २०१५ मध्ये, मीना येथे झालेल्या चेंगराचेंगरीत २४०० हून अधिक यात्रेकरूंचा मृत्यू झाला. ही चेंगराचेंगरी आतापर्यंतची सर्वाधिक प्राणघातक होती. तर त्याच वर्षाच्या सुरुवातीला मक्काच्या ग्रँड मशिदीत एक वेगळी क्रेन कोसळून १११ जणांचा मृत्यू झाला होता.