आयपीएलचा किंग कोण? हैदराबाद की कोलकाता?

देशात सध्या आयपीएल आणि लोकसभा निवडणूक यांचीच सर्वत्र चर्चा सुरू आसहे. त्यापैकी आयपीएलच्या विजेतेपदाचा फैसला रविवारी (दि. २६) होणार आहे. कोलकाता नाईट रायडर्स आणि हैदराबाद सनरायझर्स या संघांमध्ये चेन्नईतील एम. ए. चिदम्बरम स्टेडियमवर आयपीएल-१७ची अंतिम फेरी रंगणार आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Edited By Admin
  • Sun, 26 May 2024
  • 11:39 am
ipl final

संग्रहित छायाचित्र

आज रंगणार फायनलचा थरार, हैदराबाद दुसऱ्यांदा तर कोलकाता तिसऱ्यांदा चषक उंचावण्यास उत्सुक

चेन्नई : देशात सध्या आयपीएल आणि लोकसभा निवडणूक यांचीच सर्वत्र चर्चा सुरू आसहे. त्यापैकी आयपीएलच्या विजेतेपदाचा फैसला रविवारी (दि. २६) होणार आहे. कोलकाता नाईट रायडर्स आणि हैदराबाद सनरायझर्स या संघांमध्ये चेन्नईतील एम. ए. चिदम्बरम स्टेडियमवर आयपीएल-१७ची अंतिम फेरी रंगणार आहे.

पहिल्या क्वालिफायरमध्ये झुंजलेले कोलकाता आणि हैदराबाद हे दोन्ही संघ पुन्हा एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. यापैकी श्रेयस अय्यरच्या (Shreyas Iyer) नेतृत्वाखालील कोलकाता संघ तिसऱ्यांदा तर पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील हैदराबादचा संघ दुसऱ्यांदा आयपीएलचा चषक उंचावण्यास उत्सुक आहे. दोन्ही संघ तुल्यबळ असल्याने यंदा बाजी कोण मारणार, याबाबत क्रिकेटप्रेमींमध्ये उत्सुकता आहे.

यंदाच्या सीझनमध्ये कोलकाता आणि हैदराबाद संघ आतापर्यंत दोनदा आमनेसामने आले. यात दोन्ही वेळा केकेआरने बाजी मारली आहे. २१ मे रोजी झालेल्या पहिल्या क्वालिफायरमध्ये कोलकात्याने हैदराबादचा ८ विकेट आणि ३८ चेंडू राखून धुव्वा उडवला होता. त्यापूर्वी २३ मार्च रोजी झालेल्या चुरशीच्या साखळी सामन्यात कोलकाता संघाने ४ धावांनी सरशी साधली होती.

 हे पाहता अंतिम लढतीत कोलकात्याचे पारडे जड जाणवते. मात्र, टी-२० प्रकारात अशा प्रकारचा अंदाज काढणे धोक्याचे ठरू शकते. कारण, अवघ्या एक-दोन षटकात सामना फिरल्याची अनेक उदाहरणे आहेत. त्याचबोबर, हैदराबादचा संघ फलंदाज आणि गोलंदाज या दोन्ही आघाडीवर कमालीचा धोकादायक आहे. त्यामुळे विजेतेपद पटकावण्याबरोबरच क्वालिफायरसह यंदाच्या आयपीएलमधील दोन पराभवांची सव्याज परतफेड करण्याच्या इराद्याने हैदराबादचा संघ कोलकात्याविरुद्ध दोन हात करेल. दुसरीकडे, हैदराबादविरुद्ध विजयी सातत्य कायम ठेवत अंतिम सामन्या जिंकण्याच्या इर्षेने कोलकाता संघ मैदानात पाय ठेवेल.

 हेड टू हेडमध्ये कोलकाता सरस

  दोन्ही संघांचं हेड टू हेड रेकाॅर्ड पाहिलं तर कोलकात्याचा रसगुल्ला हैदराबादी बिर्याणीवर भारी पडला आहे. केकेआर आणि हैदराबाद  यांच्यामध्ये आतापर्यंत २७ वेळा लढत झाली आहे. १८ सामन्यात केकेआरने बाजी मारली आहे. यात यंदाच्या आयपीएलमधील दोन विजयांचाही समावेश आहे.  हैदराबादनं आतापर्रुंत फक्त ९ सामन्यांत कोलकात्यावर विजय मिळवला आहे.

दराबादचा विचार करता सलामीवीर ट्रॅव्हिस हेड सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत चौथ्या स्थानावर आहे. त्याने १४ ामन्यांत एक शतक आणि ४ अर्धशतकांसह १९२.२०च्या भन्नाट स्ट्राईक रेटने ५६७ धावा फटकावल्या आहेत. त्याचा सलामीचा सहकारी अभिषेक शर्मा हादेखील भन्नाट फाॅर्मात आहे. अभिषेकने १५ सामन्यांत २०७.७५च्याजबरदस्त स्ट्राईक रेटने तीन अर्धशतकांसह ४८२ धावांचा पाऊस पाडला आहे.  अनुभवी वेगवान गोलंदाज टी. नटराजननं १३ सामन्यांत हैदराबादसाठी सर्वाधिक १९ बळी घेतले आहेत. पर्पल कॅपच्या शर्यतीत तो चौथ्या स्थानी आहे.

केकेआर विरुद्ध हैदराबादची सर्वोच्च धावसंख्या २२८ राहिली आहे. तर हैदराबादविरुद्ध केकेआरची सर्वोच्च धावसंख्या २०८ आहे. केकेआरकडून अष्टपैलू सुनील नरेन फलंदाजीत सरप्रााईज पॅकेज ठरला आहे. त्याने १४ सामन्यांमध्ये एक शतक आणि तीन अर्धशतकांसह कोलकात्यासाठी सर्वाधिक ४८२ धावा ठोकल्या आहेत.  यादरम्यान त्याचा स्ट्राईक रेट १७९.८५ असा प्रभावी आहे. फिरकीपटू वरुण चक्रवर्तीनं १४ सामन्यांत केकेआरसाठी सर्वाधिक २० बळी घेतले आहेत. पर्पल कॅपच्या शर्यतीत तो तिसऱ्या स्थानी आहे.

टी-२० विश्वचषकात निवड झालेला एकही खेळाडू फायनलमध्ये नाही

सनरायझर्स हैदराबादनं राजस्थान राॅयल्सचे आव्हान संपवून आयपीएल २०२४च्या फायनलमध्ये धडक दिली. विजेतेपदासाठी या संघासमोर कोलकाता नाईट रायडर्सचे आव्हान असेल. याचदरम्यान अमेरिका आणि वेस्ट इंडीजमध्ये जून महिन्याच्या प्रारंभीपासून सुरू होणाऱ्या टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघातील अनेक खेळाडू रवाना होणार आहेत.  

पूर्वी बीसीसीआयनं निश्चित केलं होतं की, टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघात ज्या खेळाडूंची निवड झाली आहे, ते दोन टप्प्यात अमेरिकेला रवाना होतील. बीसीसीआयच्या नियोजनानुसार ज्या भारतीय खेळाडूंचा संघ आयपीएल फायनल मध्ये पोहोचणार नाही, ते २५ मे रोजी विश्वचषकासाठी अमेरिकेला रवाना होतील. त्याचबरोबर ज्या खेळाडूंचा संघ फायनलला पोहोचेल ते फायनल झाल्यानंतर २७ मे रोजी अमेरिकेला प्रयाण करतील.  

राॅयल चॅलेंजर्स बंगळुरु किंवाराजस्थान राॅयल्स यांच्यापैकी किमान एक संघ आयपीएलच्या फायनलमध्ये पोहोचला असता तर हे नियोजन उपयोगी पडले असते. मात्र प्रत्यक्षात आयपीएल फायनलमध्ये कोलकाता आणि हैदराबाद हे असे संघ पोहोचले आहेत. ज्या संघातील एकाही भारतीय खेळाडूचे नाव टी-२० विश्वचषकासाठी जाहीर भारतीय संघात नाही.  

स्थळ : एम. ए. चिदम्बरम स्टेडियम, चेन्नई
वेळ : संध्याकाळी ७.३० पासून

👍

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest