पाँटिंगची नकारघंटा! भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक होण्यासाठी पुरेसा वेळ नसल्याचे दिले कारण

भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड याचा वारस शोधण्याची प्रक्रिया वेग घेत असून भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने यासाठी जाहिरातही दिली आहे. सध्या नवीन मुख्य प्रशिक्षक म्हणून रिकी पाँटिंग, स्टीफन फ्लेमिंग यांची नावे चर्चेत आहेत. क्रिकेट मंडळाने गौतम गंभीरसोबतही मुख्य प्रशिक्षकपदासाठी संपर्क साधला होता. जस्टिन लँगर यांचेही नाव शर्यतीत असल्याचे सांगण्यात येते.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Edited By Admin
  • Fri, 24 May 2024
  • 04:18 pm

संग्रहित छायाचित्र

गंभीर, फ्लेमिंग, लँगरच्या नावांचीही चर्चा

मुंबई - भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid)याचा वारस शोधण्याची प्रक्रिया वेग घेत असून भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने यासाठी जाहिरातही दिली आहे. सध्या नवीन मुख्य प्रशिक्षक म्हणून रिकी पाँटिंग (Ricky Ponting), स्टीफन फ्लेमिंग(Stephen Fleming) यांची नावे चर्चेत आहेत. क्रिकेट मंडळाने गौतम गंभीरसोबतही (Gautam Gambhir) मुख्य प्रशिक्षकपदासाठी संपर्क साधला होता. जस्टिन लँगर (Justin Langer)यांचेही नाव शर्यतीत असल्याचे सांगण्यात येते.

 भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक होण्यासाठी आपल्याशी संपर्क साधल्याची माहिती रिकी पाँटिंगने दिली आहे. मात्र, सध्या आपल्याला ही जबाबदारी स्वीकारण्यासाठी योग्य वेळ नसल्याचे त्याने स्पष्ट केले आहे. पाँटिंगने यामागचे कारणही सांगितले आहे.

मुख्य प्रशिक्षकपदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ मे म्हणजे आयपीएल फायनलच्या दुसऱ्या दिवसापर्यंत आहे. एका वृत्तवाहिनीच्या माहितीनुसार राहुल द्रविड यांना आपला कार्यकाळ वाढविण्यात स्वारस्य नाही. त्यातच ज्यांच्या नावाची पूर्वी चर्चा होती, ते व्ही.व्ही.एस.लक्ष्मण यांनीही या पदामध्ये आपणाला स्वारस्य नसल्याचे जाहीर केले आहे. याच काळात पॉंटिंगने केलेल्या वक्तव्याने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. पाँटिंग म्हणतो की, आपणाला भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक व्हायचे आहे. मात्र, सध्या दिल्ली कॅपिटल्सचा (डीसी) मुख्य प्रशिक्षक असल्याने आणि ऑस्ट्रेलियातील संबंधित काम पाहता ही भूमिका स्वीकारणे आपणाला योग्य वाटत नाही. त्या पदासाठी हवा असणारा वेळ आपणाकडे नाही.

आयसीसी रिव्ह्यू शी बोलताना  पाँटिंग म्हणाला, मी यासंबंधीचे अनेक अहवाल पाहिले आहेत. अनेक वेळा या गोष्टी तुम्हाला कळण्यापूर्वीच सोशल मीडियावर  येतात. आयपीएल दरम्यान भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक होण्यासाठी माझ्याशी चर्चा झाली. मला या भूमिकेत रस आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी अनेकदा चर्चा झाली.

पॉंटिंग म्हणतो की, मला राष्ट्रीय संघाचा प्रशिक्षक बनायला नक्कीच आवडेल. पण, सध्या माझ्याकडे दुसरे काम आहे आणि मला माझ्या कुटुंबासही वेळ द्यावयाचा आहे. सर्वांना माहीत आहे की जर तुम्ही भारतीय संघाचे प्रशिक्षक असाल तर आयपीएलमध्ये प्रशिक्षक म्हणून काम करू शकत नाही. राष्ट्रीय संघाचा प्रशिक्षक होणं म्हणजे वर्षातील १० ते ११ महिने संघासोबत राहावे लागते. मी सध्या ज्या प्रकारचे जीवन जगतो ते लक्षात घेता ही भूमिका माझ्या जीवनशैलीत बसणारी नाही.

मात्र, पाँटिंगने ही जबाबदारी पूर्णपणे नाकारू असेही म्हटलेले नाही. त्यांचा धाकटा मुलगा फ्लेचर याने ही जबाबदारी स्वीकारण्यास सांगितले असल्याचेही त्याने म्हटले आहे. तो म्हणतो, माझे कुटुंब आयपीएलसाठी गेले पाच आठवडे माझ्यासोबत आहे. ते सर्वजण माझ्यासोबत दरवर्षी भारतात येतात. जेव्हा मी माझ्या मुलाला सांगितले की मला प्रशिक्षकपदाची ऑफर आली आहे, तेव्हा तो म्हणाला, ही ऑफर स्वीकारा, पुढील काही वर्षांसाठी मला भारतात राहायला आवडेल. माझे कुटुंबीय भारताच्या आणि येथील क्रिकेटच्या प्रेमात पडले आहे. सध्या ही ऑफर स्वीकारणं माझ्या जीवनशैलीमध्ये बसणार नाही.

पाँटिंग सध्या होबार्ट हरिकेन्सचा स्ट्रॅटेजी प्रमुख आहे. तसेच मेलबोर्न क्रिकेट क्लब (एमएलसी) त्याने मुख्य प्रशिक्षक म्हणून वॉशिंग्टन फ्रीडमसोबत दोन वर्षांचा करारही केला आहे. आगामी टी-२० विश्वचषकानंतर एमएलसीचा दुसरा हंगाम सुरू होईल. पाँटिंगने यापूर्वी ऑस्ट्रेलियाच्या टी-२० आणि एकदिवसीय संघांसोबतही काम केले आहे. बीसीसीआयने गौतम गंभीरसोबतही मुख्य प्रशिक्षकपदासाठी संपर्क साधला होता. स्टीफन फ्लेमिंग आणि जस्टिन लँगर यांचीही नावे शर्यतीत असल्याचे सांगण्यात येते.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest