अष्टपैलू खेळाडू केदार जाधवची निवृत्तीची घोषणा

भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू केदार जाधव याने सोमवारी (३ जून) क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती घेत असल्याची माहिती दिली. समाजमाध्यमांवर एक पोस्ट करत त्याने ही माहिती दिली.

संग्रहित छायाचित्र

भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू केदार जाधव (Kedar Jadhav) याने सोमवारी (३ जून) क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती घेत असल्याची माहिती दिली. समाजमाध्यमांवर एक पोस्ट करत त्याने ही माहिती दिली.  

आपल्या निवृत्तीची घोषणा करताना केदारने आपल्या करियरमधील काही छायाचित्रे आणि सोबत किशोर कुमार यांचे गाणे शेयर केले. महेंद्रसिंग  धोनी यानेही अशाच प्रकारे पोस्ट करत आपली निवृत्ती जाहीर केली होती.  (Kedar Jadhav Retirement)

केदार जाधवची कारकीर्द: 

 केदार जाधवने ७३ एकदिवसीय सामन्यात १३८९ धावा केल्या असून त्यात दोन शतके आणि सहा अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच त्याने नऊ आंतरराष्ट्रीय टी ट्वेंटी सामन्यांत एक अर्धशतकासह १२२ धावा केल्या. एकदिवसीय सामन्यात त्याने २७ गडी बाद केले. 

आयपीएल करियरमध्ये केदार जाधव याने ९५ सामने खेळले. त्याने चार अर्धशतकांसह १२०८ धावा केल्या.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest