‘त्यावेळी’ माझ्यावर कोणी विश्वास ठेवायला तयार नव्हतं : श्रेयस अय्यर

यंदाच्या आयपीएलमध्ये अंतिम फेरी गाठणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार श्रेयस अय्यर २०२३ च्या विश्वचषकानंतर तो त्याच्या पाठीच्या दुखापतीशी झुंजत होता. “...पण त्यावेळी कोणीही माझ्यावर विश्वास ठेवायला तयार नव्हते,” अशा शब्दांत असे आपले दु:ख व्यक्त केले.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Edited By Admin
  • Mon, 27 May 2024
  • 10:55 am
Shreyas Iyer

संग्रहित छायाचित्र

कोलकाता: यंदाच्या आयपीएलमध्ये अंतिम फेरी गाठणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) २०२३ च्या विश्वचषकानंतर तो त्याच्या पाठीच्या दुखापतीशी झुंजत होता.  “...पण त्यावेळी कोणीही माझ्यावर विश्वास ठेवायला तयार नव्हते,” अशा शब्दांत असे आपले दु:ख व्यक्त केले.

गतवर्षी विश्वचषकानंतर श्रेयसची इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी निवड करण्यात आली होती, परंतु पाठीच्या दुखापती मुळे शेवटच्या तीन सामन्यांसाठी श्रेयसला संघाबाहेर ठेवण्यात आले होते. राष्ट्रीय कर्तव्यावर नसताना, राष्ट्रीय क्रिकेट अकादमीने (एनसीए) खेळण्याची परवानगी देऊनही श्रेयसने मुंबईसाठी देशांतर्गत क्रिकेट खेळला नाही. त्यामुळे बीसीसीआयने त्याला केंद्रीय करारातूनही बाहेर केले.

२०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकात भारताला अंतिम फेरीत नेण्यात श्रेयसने महत्त्वाची भूमिका बजावली होती. विराट कोहली आणि कर्णधार रोहित शर्मानंतर तो या स्पर्धेत भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला होता. कोणत्याही विश्वचषकात भारतासाठी चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या खेळाडूंमध्ये त्याची कामगिरी सर्वोत्तम होती.

आता आयपीएल २०२४ च्या अंतिम सामन्यापूर्वी मीडियाशी बोलताना श्रेयसने यावर मोठे वक्तव्य दिले. श्रेयस नेतृत्व करीत असलेला कोलकाता संघ तिसरे विजेतेपद जिंकण्याचा प्रबळ दावेदार आहे. भारतीय स्टार खेळाडूने कबूल केले की त्याला कसोटीमध्ये काही समस्यांचा सामना करावा लागला.

“विश्वचषक स्पर्धेनंतर मी निश्चितपणे कसोटी फॉरमॅटमध्ये संघर्ष करत होतो. पाठदुखीची समस्या चिघळली होती. मात्र तेव्हा कोणीही माझ्यावर विश्वास ठेवायला तयार नव्हते.   त्याचवेळेस माझी स्पर्धा माझ्याशीसुद्धा होती.  आयपीएल जवळ अाल्यावर मी पूर्ण लक्ष सर्वोत्तम कामगिरी करण्यावर केंद्रित केले होते.  आमच्या योजना आणि रणनीती अंमलात आणण्यात यशस्वी झालो आणि आता आमचं पूर्ण लक्ष अंतिम सामन्यावर आहे,” असे श्रेयस अंतिम सामन्यापूर्वी म्हणाला.

आयपीएलचा यंदाचा सीझन सुरू होण्याआधी श्रेयस पाठीच्या दुखापतीशी झुंजत होता, त्यामुळे त्याच्या खेळण्यावर शंका निर्माण झाली होती. मात्र,  वेळेवर तंदुरुस्त झाल्याने तो केकेआरच्या कर्णधारपदाची जबाबदारी त्याच्याकडे सोपवण्यात आली. मात्र  रणजी ट्रॉफी सामना न खेळल्यामुळे श्रेयसलाबीसीसीआयने केंद्रीय करारातून वगळले होते. त्यानंतर त्याच्या पाठीच्या दुखापतीची बरीच चर्चा झाली होती. श्रेयस रणजीच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात खेळला नाही. परंतु त्यानंतर विदर्भाविरुद्धच्या अंतिम सामन्यात तो मुंबई संघाकडून खेळला आणि दुसऱ्या डावात त्याने ९५ धावा केल्या. यंदाच्या आयपीएलमध्ये श्रेयसने १३ सामन्यात ३८.३३ च्या सरासरीने ३४५ धावा केल्या आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest