निवृत्तीनंतर कार्तिकची टी-२० विश्वचषकात एन्ट्री!

बंगळुरु- राॅयल चॅलेंजर्स बंगळुरुचा यष्टीरक्षक-फलंदाज दिनेश कार्तिकनं नुकतीच क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. मात्र आता तो आगामी टी-२० विश्वचषकात दिसणार आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Sat, 25 May 2024
  • 01:27 pm
Dinesh Karthik

संग्रहित छायाचित्र

बंगळुरु- राॅयल चॅलेंजर्स बंगळुरुचा यष्टीरक्षक-फलंदाज दिनेश कार्तिकनं (Dinesh Karthik) नुकतीच क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. मात्र आता तो आगामी टी-२० विश्वचषकात दिसणार आहे.

 आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं आगामी टी-२० विश्वचषकासाठी स्टार समालोचकांची यादी जाहीर केली आहे. यात आयसीसीनं या स्पर्धेसाठी एकूण ४० समालोचकांची निवड केली. यामध्ये रवी शास्त्री, इयान बिशप, हर्षा भोगले आणि रिकी पाँटिंग यांच्यासारख्या दिग्गजांचा समावेश आहे. सुमारे महिनाभर चालणाऱ्या या स्पर्धेत हे सर्व ४० दिग्गज आपल्या विश्लेषणानं आणि लाइव्ह कॉमेंट्रीनं प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दिसतील. आयसीसीनं यामध्ये कार्तिकचाही समावेश केला आहे.

 कार्तिकनं अलीकडेच आयपीएलला अलविदा केला होता. त्यानं गेल्या काही समालोचनाच्या क्षेत्रातही स्वतःचं नाव कमावलं आहे. या जोरावर आता त्यानं टी-२० विश्वचषकात ही संधी मिळाली.  कार्तिकसह दिग्गज रिकी पाँटिंग, सुनील गावस्कर, मॅथ्यू हेडन, रमिझ राजा, इऑन मॉर्गन, टॉम मूडी आणि वसीम अक्रम हे देखील आगामी विश्वचषकात खेळाचं विश्लेषण करताना दिसतील. तर अमेरिकन समालोचक जेम्स ओब्रायन यांच्यावर अमेरिकन प्रेक्षकांना क्रिकेटशी जोडण्याची जबाबदारी आहे.

टी-२०विश्वचषकाला येत्या २ जूनपासून सुरुवात होणार आहे. स्पर्धेत एकूण ५५ सामने खेळले जातील. यंदा अमेरिका आणि वेस्ट इंडिज संयुक्तपणे या स्पर्धेचं आयोजन करत आहेत. पहिला सामना यजमान अमेरिका आणि कॅनडा यांच्यात खेळला जाईल.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest