पृथ्वी शॉ याच्या अडचणीत वाढ; विनयभंगप्रकरणी चौकशीचे आदेश

आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणारा स्टार खेळाडू पृथ्वी शॉच्या अडचणी वाढल्या आहेत. पृथ्वी शॉविरुद्ध मुलीच्या विनयभंगप्रकरणी चौकशी करण्याचे आदेश मुंबई न्यायालयाने पोलिसांना दिले आहेत.

Prithvi Shaw

संग्रहित छायाचित्र

आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणारा स्टार खेळाडू पृथ्वी शॉच्या (Prithvi Shaw) अडचणी वाढल्या आहेत. पृथ्वी शॉविरुद्ध मुलीच्या विनयभंगप्रकरणी चौकशी करण्याचे आदेश मुंबई न्यायालयाने पोलिसांना दिले आहेत. ही घटना गेल्या वर्षी घडली होती. त्यावर न्यायालयाने आता हा निर्णय दिला आहे.

गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये पृथ्वी शॉ आणि सोशल मीडिया स्टार सपना गिलमध्ये भांडण झाले होते. त्यानंतर काही व्हीडीओही व्हायरल झाले, ज्यामध्ये दोघांमध्ये वाद झाल्याचे पाहायला मिळाले. एकीकडे पृथ्वी शॉने सपनाविरुद्ध मारहाणीचा गुन्हा दाखल केला होता, तर दुसरीकडे सपना गिलने क्रिकेटपटूवर विनयभंगाचे आरोप केले होते. या प्रकरणी न्यायालयाने पृथ्वी शॉ विरुद्ध सपना गिलच्या विनयभंगाच्या तक्रारीची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. महानगर दंडाधिकारी एस. सी. तायडे यांनी पोलिसांना १९ जूनपर्यंत तपास अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. एफआयआर न नोंदवल्याबद्दल पोलिसांवर कारवाई करण्याची गिलची याचिका न्यायालयाने  फेटाळली. पृथ्वी शॉने अंधेरीतील एका पबमध्ये तिचा विनयभंग केल्याचा आरोप गिलने केला होता. मात्र शॉ याने हे आरोप फेटाळले आहेत. गेल्या वर्षी, पृथ्वी शॉ आणि सपना गिल यांच्यात सेल्फी घेण्यावरून वाद झाला होता. त्यावेळी शॉवर हल्ला केल्याप्रकरणी गिलला इतरांसह अटक केली होती. सपना गिल सध्या जामिनावर आहे. 

जामीन मिळाल्यानंतर तिने शॉ, त्याचा मित्र आशिष यादव आणि इतरांविरुद्ध तक्रार दाखल करण्यासाठी अंधेरी विमानतळ पोलीस स्टेशन गाठले. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल न केल्याने त्यांनी मॅजिस्ट्रेट कोर्टाचा आसरा घेतला.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest