धोनी पुढील वर्षीची आयपीएलदेखील खेळणार?

चेन्नई सुपर किंग्जचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी (Mahendra Singh Dhoni) आयपीएलच्या पुढील हंगामातही खेळू शकतो. जिओ सिनेमाच्या एका कार्यक्रमात माजी क्रिकेटपटू सुरेश रैनाने (Suresh Raina) हा दावा केला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Edited By Amol Warankar
  • Sat, 20 Apr 2024
  • 04:51 pm
Mahendra Singh Dhoni

संग्रहित छायाचित्र

चेन्नई : चेन्नई सुपर किंग्जचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी (Mahendra Singh Dhoni) आयपीएलच्या पुढील हंगामातही खेळू शकतो. जिओ सिनेमाच्या एका कार्यक्रमात माजी क्रिकेटपटू सुरेश रैनाने (Suresh Raina) हा दावा केला आहे.

काही दिवसांपूर्वी धोनीने वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्सविरुद्ध अखेरच्या षटकात सलग तीन षटकार ठोकले. या सामन्यानंतर झालेल्या चर्चेत अँकर तसेच समालोचकांनी धोनीवर स्तुतीसुमने उधळली.  या कार्यक्रमात उपस्थित माजी वेगवान गोलंदाज आरपी सिंगला अँकरने सर्वप्रथम ‘‘धोनी पुढील वर्षीही आयपीएल खेळणार का,’’ असा प्रश्न विचारला. यावर आरपी म्हणाला, ‘‘रैना हा धोनीचा जिवलग मित्र आहे. तो यावर चांगले उत्तर देऊ शकेल.’’

धोनी आणि रैना आयपीएलमध्ये चेन्नईकडून एकत्र खेळले आहेत. धोनी सध्या ४२ वर्षांचा आहे. १५ ऑगस्ट २०२० रोजी त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. मागील वर्षीपासून त्याच्या आयपीएल निवृत्तीची चर्चज्ञ होत आहे. २०२३ हे वर्ष धोनीचे शेवटचे वर्ष असेल, असे मानले जात होते. पण लखनौच्या एकना स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यादरम्यान नाणेफेक झाल्यानंतर समालोचक डॅनी मॉरिसनने धोनीला विचारले, ‘‘तू तुझा शेवटचा सीझन एन्जॉय करत आहेस का?’’ यावर धोनी हसतहसत उत्तरला, ‘‘हे माझे शेवटचे आयपीएल आहे, असे तुम्ही ठरवलेले दिसते.’’ धोनीचे हे उत्तर ऐकून माॅरिसननेही धोनी पुढच्या वर्षीही खेळताना दिसणार असल्याचे ठामपणे सांगितले.

 आयपीएलचा यंदाचा हंगाम सुरू होण्यापूर्वी चेन्नईचे कर्णधारपद ऋतुराज गायकवाडकडे सोपवण्यात आले होते. अशा परिस्थितीत धोनीचे हे आयपीएलमधील शेवटचे वर्ष असेल, असा अंदाज वर्तवला जात आहे. मुंबई इंडियन्सविरुद्ध मुंबईत झालेल्या सामन्यात  धोनीने शेवटच्या चार चेंडूंवर २० धावा फटकावल्या होत्या. मुंबईचा कर्णधार हार्दिक पंड्याला त्याने लागोपाठ तीन चेंडूवर षटकार मारले आणि एका चेंडूवर २ धावा घेतल्या. दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यातही त्याने १६ चेंडूत ३ षटकार आणि ४ चौकारांसह ३७ धावा केल्या होत्या. 

ऑरेंज कॅप

विराट कोहली, बंगळुरु

सामने ७, धावा ३६१

रियान पराग, राजस्थान

सामने ७, धावा ३१८

रोहित शर्मा, मुंबई

सामने ७, धावा २९७

पर्पल कॅप

जसप्रीत बुमराह, मुंबई

सामने ७, विकेट १३

युझवेंद्र चहल, राजस्थान

सामने ७, विकेट १२

जेराल्ड कोएत्झी, मुंबई

सामने ७, विकेट १२

 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest