आयपीएलचे हिटमॅन कोण ?

आयपीएलमध्ये सर्वात वेगवान आणि सर्वात जास्त शतक ठोकण्याचा विक्रम वेस्ट इंडिजचा धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेलच्या नावावर आहे. आयपीएलमध्ये ६ वादळी शतक ठोकणाऱ्या गेलने २०१३ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलोरकडून खेळताना चिन्नास्वामी स्डेडियममध्ये टी-२० क्रिकेटमधील सर्वात मोठी खेळी केली आणि सर्वात कमी चेंडूत १०० धावा केल्या. ख्रिस गेलने फक्त ३० चेंडूतच शतकी खेळी केली.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Mon, 27 Mar 2023
  • 12:52 pm
आयपीएलचे हिटमॅन कोण ?

आयपीएलचे हिटमॅन कोण ?

गेल, पठाण, मिलर, गिलख्रिस्टने ठोकली आहेत सर्वांत वेगवान शतके

#मुंबई

आयपीएलमध्ये सर्वात वेगवान आणि सर्वात जास्त शतक ठोकण्याचा विक्रम वेस्ट इंडिजचा धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेलच्या नावावर आहे. आयपीएलमध्ये ६ वादळी शतक ठोकणाऱ्या गेलने २०१३ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलोरकडून खेळताना चिन्नास्वामी स्डेडियममध्ये टी-२० क्रिकेटमधील सर्वात मोठी खेळी केली आणि सर्वात कमी चेंडूत १०० धावा केल्या. ख्रिस गेलने फक्त ३० चेंडूतच शतकी खेळी केली. गेलने मैदानात १३ चौकार आणि १७ षटकारांचा पाऊस पाडत ६६ चेंडूत १७५ धावा कुटल्या. ख्रिस गेलने हे शतक पुणे वॉरियर्सच्या विरोधात झालेल्या सामन्यात ठोकले होते.

भारतीय संघाचा पिंच हिटर म्हणून ओळखला जाणारा यूसुफ पठाणही आयपीएलमध्ये चमकला होता. पठाण भारताचा एकमेव फलंदाज आहे, ज्याने आयपीएलमध्ये सर्वात वेगवान शतक ठोकलं आहे. गेलनंतर वेगवान शतक ठोकण्याच्या लिस्टमध्ये पठाणच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. २०१० मध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळताना पठाणने ३७ चेंडूत १०० धावांची वादळी खेळी केली होती. या इनिंगमध्ये युसुफ पठाणने ९ चौकार आणि ८ षटकार ठोकले होते.

आयपीएलमध्ये किलर मिलर म्हणून लोकप्रिय असलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या डेविड मिलरनेही सर्वात कमी चेंडूत शतक ठोकण्याचा कारनामा केला आहे. २०२३ मध्ये मोहालीच्या मैदानावर किंग्ज इलेव्हन पंजाबकडून खेळताना डेविड मिलरने रॉयल चॅलेंजर्स बंगलोरच्या गोलंदाजांचा धुव्वा उडवला होता. मिलरने ३८ चेंडूत १०१ धावांची शतकी खेळी साकारली होती. मिलरने या इनिंगमध्ये ८ चौकार आणि ७ षटकार ठोकले होते. ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज फलंदाज ॲडम गिलख्रिस्टने २००९ मध्ये आयपीएलमधील सर्वात वेगवान पहिलं शतक ठोकलं होतं. त्यावेळी हैद्राबादच्या डेक्कन चार्जर्सचे नेतृत्व करणाऱ्या गिलख्रिस्टने ४२ चेंडूत १०० धावांची खेळी केली होती. या इनिंगमध्ये गिलख्रिस्टने ९ चौकार आणि १० षटकारांचा पाऊस पाडत १०९ धावांची खेळी साकारली होती.

आयपीएलमध्ये सर्वात वेगवान शतक ठोकणाऱ्या फलंदाजांच्या लिस्टमध्ये दक्षिण आफ्रिकेचा माजी दिग्गज फलंदाज एबी डिविलियर्स पाचव्या क्रमांकावर आहे. १४ मे २०१६ मध्ये आरसीबीकडून खेळताना गुजरात लायन्सच्या विरोधात एबी डिविलियर्सने ४२ चेंडूत शतक ठोकलं होतं. या सामन्यात डिविलियर्सने ५२ चेंडूत १० चौकार आणि १२ षटकारांच्या मदतीने नाबाद १२९ धावा कुटल्या होत्या.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story