संग्रहित छायाचित्र
पर्थ : भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया संघातील पाच सामन्यांच्या बाॅर्डर-गावसकर ट्राॅफी सिरीजला २२ नोव्हेंबरपासून सुरूवात होणार आहे. या मालिकेकच्या पार्श्वभूमीवर घरच्या मैदानावर फलंदाजी करणे आव्हानात्मक असल्याचे वक्तव्य ऑस्ट्रेलियाचा भरवशाचा फलंदाजी स्टीव्ह स्मिथ याने केले आहे.
दोन्ही संघ पहिल्या सामन्यासाठी पर्थच्या मैदानावर भिडणार आहेत. पण बॉर्डर-गावसकर ट्रॉफी सुरू होण्यापूर्वी स्मिथने मोठे वक्तव्य केले आहे. तो म्हणाला, घरच्या मैदानावर कसोटी सामन्यांमध्ये फलंदाजी करणे आता अधिक आव्हानात्मक झाले आहे. पूर्वी खेळपट्ट्या चांगल्या होत्या. आता खेळपट्ट्या आव्हानात्मक झाल्या आहेत. या खेळपट्टीवर टिकून राहण्यासाठी खूप प्रयत्न करावा लागेल.”
२००० च्या सुरुवातीच्या काळात खेळपट्ट्या खूप चांगल्या होत्या. ऑस्ट्रेलियातील वातावरण पूर्वी गोलंदाजांपेक्षा फलंदाजांना अनुकूल होते. आता ते उलटे झाले आहे. त्यामुळे घरच्या मैदानावर फलंदाजी करणे खूप कठीण असणार आहे, अशी कबुली यावेळी स्मिथने दिली.