हार्दिक आठ वर्षांनंतर सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी खेळणार

बडोदा : भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या आठ वर्षांनंतर सय्यद मुश्ताक अली टी-२० ट्रॉफी स्पर्धेत खेळताना दिसणार आहे. कृणाल पंड्याच्या नेतृत्वाखाली बडोदा संघात त्याचा समावेश करण्यात आला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Amol Machale
  • Thu, 21 Nov 2024
  • 04:59 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

बडोदा : भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या आठ वर्षांनंतर सय्यद मुश्ताक अली टी-२० ट्रॉफी स्पर्धेत खेळताना दिसणार आहे. कृणाल पंड्याच्या नेतृत्वाखाली बडोदा संघात त्याचा समावेश करण्यात आला आहे.

३१ वर्षीय हार्दिकने सय्यद मुश्ताक अली चषक स्पर्धेतील शेवटचा सामना २०१६ मध्ये खेळला होता. यंदा या स्पर्धेचा हंगाम २३ नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. पहिला सामना हैदराबाद आणि मेघालय यांच्यात राजकोटमध्ये होणार आहे. बडोद्याचा पहिला सामना गुजरातविरुद्ध इंदूर येथे होणार आहे.

दोन दिवसांपूर्वी श्रेयस अय्यरची मुंबई संघात तर मोहम्मद शमीची बंगाल संघात निवड झाली. पंजाब संघाने सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेच्या मागील हंगामात बडोद्याचा २० धावांनी पराभव करून विजेतेपद पटकावले होते.

 यंदाच्या मोसमात बडोद्याचा पहिला सामना गुजरात विरुद्ध इंदूरमध्ये होणार आहे. त्यानंतर संघाचा सामना उत्तराखंड, तामिळनाडू, त्रिपुरा, सौराष्ट्र, कर्नाटक आणि सिक्कीम या संघांशी होईल.

 हार्दिक २०१६ मध्ये शेवटची ही स्पर्धा खेळला होता. तेव्हा त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पणही केले नव्हते. सध्या बडोदा संघ जबरदस्त फॉर्मात आहे. रणजी ट्रॉफीच्या पहिल्या फेरीत संघाने २७ गुण घेतले. ते त्यांच्या गटात अव्वल स्थानी आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story