पुणे: चौथी हॉकी इंडिया वरिष्ठ पुरुष आंतरविभागीय स्पर्धा उद्यापासून

पुणे: चौथी हॉकी इंडिया वरिष्ठ पुरुष आंतरविभागीय स्पर्धा गुरुवार, 5 सप्टेंबर 2024 पासून मेजर ध्यानचंद स्टेडियम, नेहरूनगर-पिंपरी येथे खेळली जाणार आहे. माजी हॉकी स्टार्सचा समावेश असलेल्या या स्पर्धेच्या जेतेपदासाठी गतविजेता पेट्रोलियम स्पोर्ट्स प्रमोशन बोर्डासह 18 संघांमध्ये चुरस आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Wed, 4 Sep 2024
  • 07:12 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

पुणे: चौथी हॉकी इंडिया वरिष्ठ पुरुष आंतरविभागीय स्पर्धा उद्यापासून

माजी हॉकी स्टार्सचा खेळ पाहण्याची आणखी एक संधी, गतविजेता पेट्रोलियम स्पोर्ट्स प्रमोशन बोर्डासह 18 संघांमध्ये जेतेपदासाठी चुरस

पुणे: चौथी हॉकी इंडिया वरिष्ठ पुरुष आंतरविभागीय स्पर्धा गुरुवार, 5 सप्टेंबर 2024 पासून मेजर ध्यानचंद स्टेडियम, नेहरूनगर-पिंपरी येथे खेळली जाणार आहे. माजी हॉकी स्टार्सचा समावेश असलेल्या या स्पर्धेच्या जेतेपदासाठी गतविजेता पेट्रोलियम स्पोर्ट्स प्रमोशन बोर्डासह 18 संघांमध्ये चुरस आहे.

10 दिवस चालणार्‍या या स्पर्धेचा अंतिम सामना रविवार, 15 सप्टेंबर रोजी होईल. हॉकी महाराष्ट्र हे वरिष्ठ पुरुष आंतरविभागीय स्पर्धेचे प्रथमच आयोजन करत असून बेंगळुरू आणि नवी दिल्लीनंतरचे स्पर्धा आयोजन करणारे तिसरे शहर आहे. या स्पर्धेमुळे पुण्यातील हॉकी चाहत्यांना आठवडाभर सर्वोत्तम हॉकी सामन्याचा आनंद लुटता येईल.

हॉकी महाराष्ट्रातर्फे यंदा (2024) आयोजन केली जाणारी दुसरी राष्ट्रीय स्पर्धा आहे. यापूर्वी, मार्च 2024 मध्ये 14वी वरिष्ठ महिला स्पर्धा आयोजित केली होती. वरिष्ठ पुरुष आंतरविभागीय स्पर्धेच्या निमित्ताने सहभागी 18 संघांमध्ये समाविष्ट आजी-माजी हॉकीपटूंचा खेळ पाहण्याची मेजवानी पुणेकरांना आहे.

स्पर्धेचा आढावा घेतल्यास, दोन वेळचे आणि गतविजेते पेट्रोलियम स्पोर्ट्स प्रमोशन बोर्ड जेतेपद कायम राखण्याचा प्रयत्न करतील.2022मधील विजेतेपदानंतर रेल्वे स्पोर्ट्स प्रमोशन बोर्ड (आरएसपीबी) पुन्हा ट्रॉफी उंचावण्यास उत्सुक आहे.

माजी आंतरराष्ट्रीय खेळाडू हे यंदाच्या वरिष्ठ पुरुष आंतरविभागीय स्पर्धेतील मुख्य आकर्षण असतील. या स्पर्धेत टोक्यो ऑलिम्पिक  खेळलेले सुरेंदर कुमार, आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता आकाशदीप तसेच ऑलिम्पियन धरमवीर आणि दिलप्रीत सिंग हे स्टार खेळताना दिसतील.

या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्रातील सर्वोत्तम खेळाडूंचा समावेश
आंतरराष्ट्रीय खेळाडू युवराज वाल्मिकी, ऑलिम्पियन देविंदर वाल्मिकी, ज्युनियर वर्ल्ड कप विजेत्या संघात खेळलेला आदित्य लालगे, भारताचे प्रतिनिधित्व केलेले टेरॉन परेरा, अकिब रहीम, प्रताप शिंदे, नियाज रहीम, दर्शन गावकर, अमित गौडा, विक्रम यादव यांच्याशिवाय अजिंक्य जाधव आणि अनिकेत गुरव हे खेळाडू स्पर्धेत खेळतील..

18 संघांना चार गटांमध्ये विभागले गेले आहे. प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरतील.

अ गटात 2021 आणि 2023 मधील विजेते आणि 2022 उपविजेते पेट्रोलियम स्पोर्ट्स प्रमोशन बोर्ड, आयपीबीपी, सेंट्रल हॉकी संघ, भारतीय क्रीडा प्राधिकरण, सेंट्रल सिव्हिल सर्व्हिसेस कल्चर अँड स्पोर्ट्स आणि सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस संघांचा समावेश आहे.

2022 मधील विजेता रेल्वे स्पोर्ट्स प्रमोशन बोर्डचा ब गटात समावेश असून ऑल इंडिया पोलीस स्पोर्ट्स कंट्रोल बोर्ड, गुजरात क्रीडा प्राधिकरण - हॉकी अकॅडमी आणि स्टील प्लांट्स स्पोर्ट्स बोर्ड संघांचा त्यात समावेश आहे.

क गटामध्ये तीनदा (2021, 2022, 2023) तिसरे स्थान असलेले सर्व्हिसेस स्पोर्ट्स कंट्रोल बोर्ड, फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, सशस्त्र सीमा बल आणि तामिळनाडू पोलीस असे संघ आहेत.

ब गटामध्ये पंजाब नॅशनल बँक, पंजाब अँड सिंध बँक, आयटीबीपी सेंट्रल हॉकी संघ आणि सशस्त्र सीमा बल संघांचा समावेश आहे.

हॉकी महाराष्ट्रचे वरिष्ठ उपाध्यक्ष मनोज भोरे यांनी चौथ्या हॉकी इंडिया वरिष्ठ पुरुष आंतरविभागीय स्पर्धेच्या आयोजनाच्या पार्श्वभूमीवर म्हटले आहे की, पुण्यात राष्ट्रीय हॉकी स्पर्धांचे कायम आयोजन करण्यासह महाराष्ट्रातील हॉकीला प्रोत्साहन देण्यादृष्टीने या स्पर्धेला मोठे महत्त्व आहे. या स्पर्धेत 18 सर्वोत्कृष्ट विभागीय संघांचा समावेश आहे.

चौथ्या हॉकी इंडिया वरिष्ठ पुरुष आंतरविभागीय स्पर्धेचा सलामीचा सामना स्टील प्लांट्स स्पोर्ट्स बोर्ड विरुद्ध ऑल इंडिया पोलीस स्पोर्ट्स प्रमोशन बोर्ड यांच्यात गुरुवारी दुपारी 1.15 वाजता होईल.

स्पर्धेचे उद्घाटन डॉ. राजेश देशमुख (आयएएस), आयुक्त क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य आणि शेखर सिंग, आयएएस, आयुक्त पिंपरी चिंचवड महानगरपालिका (पीसीएमसी) यांच्या हस्ते होईल.

माजी ऑलिम्पियन, माजी कर्णधार, माजी प्रशिक्षक तसेच 1998 अर्जुन पुरस्कार विजेते मोहम्मद रियाझ कृष्ण प्रकाश हे प्रमुख पाहुणे असतील. कृष्णा प्रकाश, आयपीएस, एडीजी, फोर्स वन महाराष्ट्र पोलीस आणि अध्यक्ष, हॉकी महाराष्ट्र यांच्यासह मनीष आनंद, मानद सचिव हॉकी महाराष्ट्र आणि मनोज भोरे, वरिष्ठ उपाध्यक्ष हॉकी महाराष्ट्र यांची यावेळी प्रमुख उपस्थिती असेल. 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest