आंतरराष्ट्रीय कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेत SMA च्या खेळाडूंची उत्तुंग भरारी!

औरंगाबाद येथे आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय कराटे चॅम्पियनशिप २०२४ मध्ये शिवतेज मार्शल आर्टस् अँड स्पोर्ट्स अकॅडमीने उत्कृष्ट यश संपादन केले .

International Karate Championship 2024

आंतरराष्ट्रीय कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेत SMA च्या खेळाडूंची उत्तुंग भरारी!

पुणे : औरंगाबाद येथे आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय कराटे चॅम्पियनशिप २०२४ मध्ये शिवतेज मार्शल आर्टस् अँड स्पोर्ट्स अकॅडमीने उत्कृष्ट यश संपादन केले . काथा आणि कुमिथे या प्रकारात एकूण १५ खेळाडू सहभागी झाले होते . खेळाडूंनी एकूण ३० पदके मिळवली त्या पैकी सुवर्ण १५, रौप्य १०  व कांस्य ५ अशी पदके आहेत.

संस्थेचे संस्थापक सुरेश यादव यांच्या नेतृत्वाखाली ही कामगिरी खेळाडूंनी केली. देवेन जाधव, देवांक पुरंदरे , सार्थक शिरगावकर , समर्थ शेलार , श्रीराज गाढवे,अनिश डावखरे ,तन्मय चव्हाण ,राज टकले ,सानवी कर्मचंदानी, रिया वाघमारे ,ओवी थोपटे , प्रिया भुक्के , वंदिनी विश्वकर्मा ,गायत्री टकले , रेश्मा गुजर या खेळाडूंनी सहभाग घेतला होता. या स्पर्धसाठी भारत ,नेपाळ ,भूतान आणि बांगलादेशातूनही खेळाडू सहभागी झाले होते.

 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest