संग्रहित छायाचित्र....
Team India 2025 Full ODI Schedule : साल 2024 मध्ये टीम इंडियाची कामगिरी संमिश्र होती. 2024 चा टी- 20 विश्वचषक जिंकून त्यांनी इतिहास रचला असताना, बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या दोन कसोटी सामन्यांमध्ये आणि श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. आता साल 2025 मध्ये भारतीय संघ आपला खेळ आणखी सुधारण्यासाठी सज्ज झाला आहे. 2025 मध्ये टीम इंडियाचे वेळापत्रक खूप व्यस्त असेल.
भारतीय संघाला साल 2025 मध्ये कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 क्रिकेटसह 50 हून अधिक सामने खेळायचे आहेत. हे वेळापत्रक खेळाडू आणि चाहत्यांसाठी रोमांच आणि आव्हानांनी भरलेले असेल. चला तर मग 2025 मध्ये भारताची एकदिवसीय मालिका केव्हा आणि कुठे होणार आहे, यासोबतच संपूर्ण वेळापत्रकही जाणून घेऊया.
फेब्रुवारी: भारत विरुद्ध इंग्लंड
पहिला वनडे : 6 फेब्रुवारी, नागपूर
दुसरी वनडे : 9 फेब्रुवारी,कटक
तिसरी वनडे : 12 फेब्रुवारी,अहमदाबाद
फेब्रुवारी-मार्च : चॅम्पियन्स ट्रॉफी 2025
भारत विरुद्ध बांगलादेश : (दुबई) 20 फेब्रुवारी
भारत विरुद्ध पाकिस्तान : (दुबई) 23 फेब्रुवारी
भारत विरुद्ध न्यूझीलंड : (दुबई) 2 मार्च रोजी
पुढे आगेकूच केल्यास...
उपांत्य फेरी सामना : 4 मार्च
अंतिम सामना : 9 मार्च
ऑगस्ट 2025 (भारत विरुद्ध बांगलादेश) : भारत ऑगस्टमध्ये बांगलादेशचा दौरा करणार आहे, जिथे दोन्ही संघांमध्ये तीन एकदिवसीय आणि तीन टी-20 सामन्यांची मालिका खेळवली जाईल.
नोव्हेंबर 2025 (भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया) : भारत नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियाचा दौरा करणार आहे, जिथे दोन्ही संघ तीन एकदिवसीय आणि पाच टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहेत.
नोव्हेंबर-डिसेंबर 2025 (भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका) : भारतीय संघ नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये दक्षिण आफ्रिकेसोबत तिन्ही फॉरमॅटची मालिका खेळणार आहे. या काळात दोघांमध्ये दोन कसोटी, तीन एकदिवसीय आणि पाच टी-20 सामन्यांची मालिका खेळवली जाईल.
2025 मध्ये आशिया चषक आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल : 2025 मध्ये फक्त चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा खेळवली जाणार नाही. खरं तर, यावर्षी आणखी दोन मोठ्या स्पर्धांचे अंतिम सामने पाहायला मिळणार आहेत. सर्व प्रथम, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 चा अंतिम सामना जून महिन्यात लंडनमधील लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर खेळवला जाणार आहे. यानंतर टी-20 आशिया कपही खेळवला जाणार आहे. जो ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात खेळवला जाणार आहे.