Virat Kohli failed once again in this series. He became the victim of Scott Boland
India vs Australia 5th Test Day 1 Live Cricket Score : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाचवी आणि शेवटची कसोटी आजपासून (शुक्रवार) सुरू होत आहे. ही कसोटी सिडनीत खेळवली जात आहे. सध्या ऑस्ट्रेलियन संघ मालिकेत 2-1 ने आघाडीवर आहे. हा सामना जिंकून मालिका बरोबरीवर सोडण्याचा भारतीय संघाचा निर्धार आहे.
पहिल्या दिवशी चहापानापर्यंत भारताने चार गडी गमावून 107 धावा केल्या होत्या. सध्या ऋषभ पंत नाबाद 32 धावांवर आणि रवींद्र जडेजा नाबाद 11 धावांवर खेळत आहेत. दोघांमध्ये आतापर्यंत 35 धावांची भागीदारी झाली आहे.
That'll be Tea on Day 1 of the 5th Test.#TeamIndia 107/4
— BCCI (@BCCI) January 3, 2025
Scorecard - https://t.co/NFmndHLfxu… #AUSvIND pic.twitter.com/q42yTpdIDF
भारताच्या पहिल्या सत्रात 57 धावा झाल्या, तर दुसऱ्या सत्रात 50 धावा झाल्या. दोन्ही सत्रात 25-25 षटके खेळली गेली. भारताने पहिल्या सत्रात तीन गडी गमावले, तर दुसऱ्या सत्रात भारताची एक विकेट पडली. यशस्वी जैस्वाल 10 धावा, केएल राहुल 4 धावा , शुभमन गिल 20 धावा आणि विराट कोहली 17 धावा करून बाद झाला. आघाडीचे चार फलंदाज मिळून केवळ 51 धावा करू शकले. दरम्यान, पंत गेल्या दोन तासांपासून फलंदाजी करत आहे. दुसऱ्या सत्राच्या सुरुवातीला तो फलंदाजीला आला आणि तेव्हापासून तो खेळपट्टीवर टिकून आहे. आता त्याच्याकडून खूप अपेक्षा आहेत.
विराट पुन्हा अपयशी....
भारताला 72 धावांवर चौथा धक्का बसला. या मालिकेत विराट कोहली पुन्हा एकदा अपयशी ठरला. 17 धावा करून तो स्कॉट बोलंडचा बळी ठरला. पुन्हा ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडूशी छेडछाड करण्याच्या प्रयत्नात चेंडू त्याच्या बॅटची कड घेऊन स्लिपमध्ये गेला. ब्यू वेबस्टरनं त्याचा झेल घेतला. पर्थच्या दुसऱ्या डावात शतक झळकावण्यापूर्वी आणि नंतर विराटचा फॉर्म चिंतेचा विषय ठरला आहे.
दोन्ही संघ पुढीलप्रमाणे...
भारत : केएल राहुल, यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, प्रसीध कृष्णा, जसप्रीत बुमराह (कर्णधार), मोहम्मद सिराज.
ऑस्ट्रेलिया : सॅम कॉन्स्टास, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, स्टीव्ह स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, ब्यू वेबस्टर, ॲलेक्स कॅरी (विकेटकीपर), पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन, स्कॉट बोलँड.