IND vs AUS 5th Test : कर्णधार असूनही रोहितला वगळले, तर मग विराटला वेगळा न्याय का? चाहत्यांकडून निवडकर्त्यांना विचारणा....

खराब कामगिरी करणाऱ्या सगळ्यांनाच दाखवा बाहेरचा रस्ता, कर्णधारावर कारवाई होते मग खेळाडूवर का नाही?

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Fri, 3 Jan 2025
  • 02:36 pm
Rohit Sharma vs Virat Kohli

Rohit Sharma vs Virat Kohli (file pic)

IND vs AUS 5th Test  (Rohit Sharma vs Virat Kohli)  : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीतील शेवटच्या सामन्यास शुक्रवारपासून सिडनी येथे सुरूवात झाली आहे. या सामन्यापूर्वी टीम इंडियामध्ये मोठा गोंधळ उडाला आहे. रोहित शर्माला प्लेइंग इलेव्हनमधून वगळण्यात आल आहे. खराब कामगिरी करणाऱ्या रोहितला वगळण्यात येत असेल तर विराटला संघात स्थान का देण्यात येत आहे, असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे.

रोहित शर्माला संघातून वगळण्यात आल्याची चर्चा सुरू असताना आता विराट कोहलीवर पुन्हा कारवाई का केली जाऊ नये, असा प्रश्न उपस्थित होत आहे. केवळ रोहितच खराब फॉर्ममधून जात नाही. या मालिकेत विराट कोहलीची कामगिरीही खूपच खराब झाली आहे. रोहित शर्मा केवळ त्याच्या फॉर्ममुळे धावा करू शकला नाही, पण या संपूर्ण मालिकेत विराट कोहलीला चांगली सुरुवात मिळाली, तरीही त्याने बेफिकीर शॉट्स खेळून आपली विकेट गमावली. अशा परिस्थितीत रोहित शर्माला प्लेइंग इलेव्हनमधून वगळल्यास विराट कोहलीलाही शिक्षा व्हायला हवी.

रोहित शर्मा या सीरिजमध्ये सपशेल फेल ठरला आहे. त्यानं आत्तापर्यंत या सीरिजमध्ये फक्त 31 धावा केल्या आहेत. रोहित पर्थमध्ये झालेली पहिली टेस्ट कौटुंबिक कारणामुळे खेळला नव्हता. पण, त्यानंतरच्या तिन्ही टेस्टमध्ये तो अपयशी ठरला आहे. त्याला एकाही इनिंगमध्ये मोठा स्कोअर करता आलेला नाही. रोहितने पाच इनिंगमध्ये  3, 6, 10, 3 आणि 9 धावा केल्या आहेत. त्याची या सीरिजमधील सरासरी 6.20 आहे. ऑस्ट्रेलियामध्ये कोणत्याही विदेशी कॅप्टनची ही सर्वात कमी सरासरी आहे. रोहित  सप्टेंबर महिन्यापासूनच सातत्यानं टेस्ट क्रिकेटमध्ये फेल होत आहे. त्याने या कालावधीमध्ये फक्त 164 धावा केल्या आहेत. त्याची सरासरी 10 पेक्षा थोडी जास्त आहे.  

एकही चौकार नसलेली खेळी

टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहलीसाठी 2024 हे वर्ष खूप वाईट होते. वर्षभर तो आपल्या खराब फॉर्मशी झुंजत राहिला. 2025 मध्ये विराट चांगली सुरुवात करेल अशी चाहत्यांना आशा होती, पण जुन्या कमकुवतपणामुळे नवीन वर्षातही त्याने विकेट गमावली. सिडनीमध्ये खेळल्या जात असलेल्या शेवटच्या कसोटीत विराट ऑफ स्टंपच्या बाहेर जाणाऱ्या चेंडूवर आऊट झाला आणि यासोबतच त्याने एक लज्जास्पद विक्रमही नोंदवला. विराटची ही खेळी त्याच्या कसोटी कारकिर्दीतील एकही चौकार नसलेली सर्वात मोठी खेळी ठरली आहे.

सिडनी कसोटीत विराट कोहलीने 69 चेंडूंचा सामना करत केवळ 17 धावा केल्या. 69 चेंडूत विराटने एकही चौकार मारला नाही आणि एकही षटकार त्याच्या बॅटमधून आला नाही. ही खेळी त्याच्या कसोटी कारकिर्दीतील एकही चौकार नसलेली सर्वात मोठी खेळी ठरली. यापूर्वी 2021 मध्ये इंग्लंडविरुद्ध 48 चेंडू खेळताना विराटने एकही चौकार मारला नव्हता. तेव्हा विराटने केवळ 11 धावा केल्या होत्या. ऑस्ट्रेलिया दौरा विराटसाठी अजिबात चांगला राहिला नाही.

पहिल्या कसोटीतील पहिल्या डावात फ्लॉप ठरल्यानंतर दुसऱ्या डावात त्याने नाबाद शतक झळकावले होते. मात्र यानंतर विराट कोहलीने ॲडलेड, ब्रिस्बेन आणि मेलबर्न येथील कसोटी सामन्यात साफ निराशा केली आहे. हा क्रम सिडनीतही खंडित झालेला नाही. सध्याच्या मालिकेत विराटला पाच सामन्यांच्या 9 डावात केवळ 184 धावा करता आल्या आहेत. एका शतकाशिवाय त्याच्या बॅटमधून एक अर्धशतकही आले नाही.

या मालिकेतील विराट कोहलीच्या कामगिरीबद्दल बोलायचे झाले तर त्याने 7 डावात केवळ 167 धावा केल्या आहेत. विराट कोहलीच्या गेल्या एका वर्षातील कामगिरीवर नजर टाकली तर तो एकूण 10 सामन्यांमध्ये दिसला. ज्यामध्ये त्याने 24.52 च्या सरासरीने केवळ 417 धावा केल्या. गेल्या वर्षी विराट कोहलीच्या नावावर फक्त एक कसोटी शतक होते, जे त्याने बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2024-2025 च्या पर्थ कसोटीत झळकावले होते. अशाप्रकारे पर्थ कसोटीच्या दुसऱ्या डावातील त्याचे शतक वगळले तर विराट कोहली सपशेल अपयशी ठरत आहे. अशा स्थितीत त्याच्या कामगिरीच्या जोरावर त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळू शकणार नाही.

Share this story

Latest