India vs Maldives
FIFA Women’s Friendly Match 2025 (Bangalore) : पदार्पणातच्या सामन्यातच लिंगडेकिमने प्रभावी कामगिरी केली. तिने केलेल्या चार गोलच्या जोरावर भारतीय महिला संघाने गुरुवारी बंगळुरू येथील दुसऱ्या फिफा आंतरराष्ट्रीय मैत्रीपूर्ण सामन्यात मालदीववर 11-1 असा शानदार विजय नोंदवला. पहिल्या सामन्यात यजमान संघाने प्रतिस्पर्धी संघाचा 14-0 असा धुव्वा उडवला होता.
A stroll in the park for #BlueTigresses 🐯
— Indian Football Team (@IndianFootball) January 2, 2025
Maldives 🇲🇻 beaten comprehensively in the New Year's first FIFA friendly 🤩#MDVIND #IndianFootball ⚽ pic.twitter.com/jitNILgKxw
आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधील भारतीय महिला संघाचा हा दुसरा सर्वात मोठा विजय होता. यापूर्वी बांगलादेशमध्ये 2010 च्या दक्षिण आशियाई फुटबॉल फेडरेशन (SAFF) चॅम्पियनशिपमध्ये संघाने भूतानचा 18-0 ने पराभव केला होता. आणखी एक महत्वाचे म्हणजे भारताचे नवनियुक्त स्वीडन प्रशिक्षक जोकीम अलेक्झांडरसन यांनी पदभार स्विकारल्यानंतरचा हा भारताचा दुसऱ्या सामन्यातील हा सलग दुसरा विजय ठरला. यासह प्रशिक्षक जोकीम यांच्या कार्यकाळाची सुरुवात शानदार विजयाने झाली आहे.
पादुकोण-द्रविड सेंटर फॉर स्पोर्ट्स एक्सलन्स येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या सामन्यात लिंगडेकिमने (12व्या, 16व्या, 56व्या आणि 59व्या मिनिटाला)प्रत्येक हाफमध्ये प्रत्येकी दोन गोल केले तर सामन्यात आणखी एका पदार्पण करणाऱ्या एन. सिबानी देवी या खेळाडूनं (45+1व्या मिनिटाला) एक गोल केला.
याव्यतिरिक्त सामन्यात भारताकडून काजोल डिसूझा (15वे मिनिट), पूजा (41वे मिनिट), सिमरन गुरुंग (62वे आणि 68वे मिनिट) आणि खुमुकचाम भूमिका देवी (71वे मिनिट) यांनी गोल करत संघाच्या विजयात महत्वपूर्ण योगदान दिलं. मालदीवसाठी एकमेव गोल मरियम रिफाने 27व्या मिनिटाला केला. तर मालदीवची कर्णधार हवा हनीफाने 17व्या मिनिटाला आत्मघाती गोल केला, ज्यामुळे भारताच्या गोलसंख्येमध्ये आणखी वाढ झाली.