प्रातिनिधिक छायाचित्र....
Rohit Sharma Retirement : भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने शनिवारी आपल्या निवृत्तीबाबतच्या सर्व अटकळांना पूर्णविराम देत सिडनी कसोटीनंतर कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेणार नसल्याचे सांगितले. भारतीय कर्णधाराने खराब फॉर्ममुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सिडनी कसोटीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. पण यानंतर अशा चर्चांना उधाण आले होते की, कसोटी कारकिर्दीतील ही रोहितची शेवटची कसोटी आहे.
रोहितनं भविष्याबद्दल केलं 'हे' विधान....
सिडनी कसोटी सामन्याच्या दुस-या दिवशी लंच ब्रेक दरम्यान ब्रॉडकास्टरला दिलेल्या मुलाखतीत रोहितने त्याच्या कसोटी भवितव्याबद्दलच्या अटकळांना पूर्णविराम दिला. या मुलाखतीत शर्मा याने नजीकच्या भविष्यातील योजनांबद्दलही सांगितले. रोहितनं सांगितले की, "खराब फॉर्ममुळे केवळ या सामन्यासाठी त्याने प्लेइंग इलेव्हनमधून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे आणि खेळापासून दूर जाण्याचा कोणताही विचार नाही."
🚨 ROHIT SHARMA CONFIRMS HE IS NOT RETIRING ANYTIME SOON. 🚨
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) January 4, 2025
Rohit said, "runs are not coming now, but not guaranteed it'll not come 5 months later. I'll work hard". pic.twitter.com/Hte8VT74kW
पुढे तो म्हणाला की, मी समजूतदार आहे, सुज्ञ आहे आणि 2 मुलांचा बाप आहे. त्यामुळे आयुष्यात थांबायचे आधी हे मला पक्के ठाऊक आहे. कधी काय करायचे हे मला माहीत आहे. संघासाठी काय योग्य आहे हे समजून घेण्याला मी नेहमीच प्राधान्य दिले आहे. ही माझी वैयक्तिक विचारसरणी आहे आणि मी याचपद्धतीने क्रिकेट खेळत आलो आहे आणि मी क्रिकेटच्या बाहेरही असाच आहे. एक व्यक्ती म्हणून मी खूप पारदर्शक असल्याचे सांगत रोहित शर्मा याने निवृत्तीची शक्यता फेटाळून लावली आहे.
सिडनी कसोटीत रोहित शर्माने त्याचा खराब फॉर्म पाहून न खेळण्याचा निर्णय घेतला होता. रोहित सिडनी कसोटीच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये नसल्यामुळे तो कधीही कसोटीतून निवृत्ती जाहीर करू शकतो, अशी चर्चा सुरू होती. रोहितला प्रशिक्षक आणि व्यवस्थापनाने संघातून वगळल्याचा दावा अनेक बातम्यांमध्ये करण्यात आला होता. मात्र कर्णधार रोहित शर्माने हे सर्व दावे फेटाळून लावले आहेत. याशिवाय कसोटीत पुनरागमन करण्याबाबत रोहितने स्पष्ट असे वक्तव्य केले आहे.
सध्या कसोटीतून निवृत्ती घेत नसल्याचे स्पष्ट करताना रोहित म्हणाला की, मी कसोटीत नक्की पुनरागमन करेल. हा काही निवृत्तीचा निर्णय नाही. मी फक्त फॉर्मात नसल्यामुळे खेळत नाही. गोष्टी रोज बदलत असतात आणि मला पूर्ण विश्वास आहे की गोष्टी बदलतील. मला माझ्याशी प्रामाणिक राहण्याबरोबरच जे वास्तव आहे तेही पाहावे लागणार आहे. मी समजूतदार आहे, सुज्ञ आहे आणि २ मुलांचा बाप आहे. त्यामुळे कधी काय करायचे हे मला माहीत आहे. संघासाठी काय योग्य आहे हे समजून घेणे आवश्यक आहे. आपण संघाला काय गरजेचे आहे याचाही नेहमी विचार केला पाहिजे. ही माझी वैयक्तिक विचारसरणी आहे आणि मी याचपद्धतीने क्रिकेट खेळत आलो आहे आणि मी क्रिकेटच्या बाहेरही असाच आहे. एक व्यक्ती म्हणून मी खूप पारदर्शक आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर टीम इंडियाला आता जूनमध्ये इंग्लंडविरुद्ध पुढील कसोटी मालिका खेळायची आहे. त्याचबरोबर या मालिकेपूर्वी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामनाही खेळवला जाणार आहे. टीम इंडिया यासाठी पात्र ठरेल की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
बाहेरची व्यक्ती ते कसं काय सांगणार?
बाहेरची कोणीही व्यक्ती मी खेळातून कधी पायउतार व्हावे हे सांगू शकत नाही. एखादी व्यक्ती माईक, लॅपटॉप किंवा पेनने काय लिहित आहे किंवा काय बोलत आहेत हे महत्त्वाचे नाही. आम्ही इतकी वर्षे खेळत आहोत त्यामुळे आम्ही केव्हा खेळायचे किंवा केव्हा खेळायचे नाही किंवा कधी बाहेर बसायचे किंवा कधी संघाचे नेतृत्व करायचे हे ते ठरवू शकत नाहीत. जसप्रीत बुमराहबाबत बोलताना रोहित शर्मा म्हणाला, “ज्याप्रमाणे बुमराहने कामगिरी केली आहे ते पाहता त्याने एक दर्जा तयार केला आहे. 2013 मध्ये जेव्हा मी त्याला पहिल्यांदा पाहिले, तेव्हापासून आतापर्यंत त्याच्या कामगिरीचा आलेख खरोखरच उंचावला आहे आणि तो सातत्याने वाढत आहे. क्रिकेटचा हा फॉरमॅट तुम्हाला आयते काही देत नाही, तुम्हाला ते कमवावे लागते.