IND vs AUS 5th Test (Day 1) : सिडनीमध्ये ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा भेदक मारा, टीम इंडिया पहिल्या डावात अवघ्या 185 धावांवर गारद...

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाचवी आणि शेवटची कसोटी शुक्रवारपासून सुरू झाली आहे. ही कसोटी सिडनीत खेळवली जात आहे. सध्या ऑस्ट्रेलियन संघ मालिकेत 2-1 ने आघाडीवर आहे.

India vs Australia 5th Test ,

Team India all out on 185 in the first innings.

India vs Australia 5th Test Day 1 Live Cricket Score | भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाचवी आणि शेवटची कसोटी शुक्रवारपासून सुरू झाली आहे. ही कसोटी सिडनीत खेळवली जात आहे. सध्या ऑस्ट्रेलियन संघ मालिकेत 2-1 ने आघाडीवर आहे. हा सामना जिंकून मालिका बरोबरीवर सोडण्याचा भारतीय संघाचा निर्धार आहे. 

सिडनी येथे खेळल्या जात असलेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2024-25 च्या पाचव्या कसोटीच्या पहिल्या डावात ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी कहर केला. शुक्रवारी (03 जानेवारी) सुरू झालेल्या सामन्यात टीम इंडियाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. पण हा निर्णय चुकीचा ठरला, कारण प्रथम फलंदाजी करताना बुमराहच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया अवघ्या 185 धावांत गारद झाली.

भारताचा पहिला डाव 185 धावांवर आटोपला. भारतीय संघ केवळ 72.2 षटकेच खेळू शकला. ऋषभ पंतने संघाकडून सर्वाधिक 40 धावा केल्या. याशिवाय रवींद्र जडेजा 26, कर्णधार जसप्रीत बुमराह 22 धावा, शुभमन गिल 20 धावा, विराट कोहली 17 धावा आणि यशस्वी जैस्वाल 10 धावा करू शकला. याशिवाय इतर फलंदाजांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. केएल राहुलला चार, प्रसिद्ध कृष्णाला तीन आणि मोहम्मद सिराजला तीन धावा करता आल्या. नितीश रेड्डी याला खातेही उघडता आले नाही. ऑस्ट्रेलियाकडून  गोलंदाजीत स्कॉट बोलंडने चार, तर मिचेल स्टार्कने तीन बळी घेतले. पॅट कमिन्सने दोन, तर नॅथन लायनला एक विकेट मिळाली.

विराट पुन्हा अपयशी....

भारताला 72 धावांवर चौथा धक्का बसला. या मालिकेत विराट कोहली पुन्हा एकदा अपयशी ठरला. 17 धावा करून तो स्कॉट बोलंडचा बळी ठरला. पुन्हा ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडूशी छेडछाड करण्याच्या प्रयत्नात चेंडू त्याच्या बॅटची कड घेऊन स्लिपमध्ये गेला. ब्यू वेबस्टरनं त्याचा झेल घेतला. पर्थच्या दुसऱ्या डावात शतक झळकावण्यापूर्वी आणि नंतर विराटचा फॉर्म चिंतेचा विषय ठरला आहे.

दोन्ही संघ पुढीलप्रमाणे...

भारत : केएल राहुल, यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, प्रसीध कृष्णा, जसप्रीत बुमराह (कर्णधार), मोहम्मद सिराज.

ऑस्ट्रेलिया : सॅम कॉन्स्टास, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, स्टीव्ह स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, ब्यू वेबस्टर, ॲलेक्स कॅरी (विकेटकीपर), पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन, स्कॉट बोलँड.

Share this story

Latest