Sports Awards 2024 : राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांची घोषणा, मनू भाकर-गुकेशसह चार खेळाडूंना मिळणार खेलरत्न....

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दोन ऑलिम्पिक पदके जिंकणारी भारतीय महिला नेमबाज मनू भाकर आणि जागतिक बुद्धिबळ चॅम्पियनशिप विजेता भारतीय ग्रँडमास्टर डी गुकेश यांच्यासह चार खेळाडूंना खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Thu, 2 Jan 2025
  • 03:36 pm
National Sports Awards 2024,Manu Bhaker

Sports Awards 2024 : क्रीडा मंत्रालयाने गुरुवारी राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार 2024 जाहीर केले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 17 जानेवारी रोजी राष्ट्रपती भवनात विजेत्यांचा सत्कार करतील. मनू भाकर आणि डी गुकेश यांच्यासह चार खेळाडूंना खेलरत्न देण्यात येणार आहे.

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दोन ऑलिम्पिक पदके जिंकणारी भारतीय महिला नेमबाज मनू भाकर आणि जागतिक बुद्धिबळ चॅम्पियनशिप विजेता भारतीय ग्रँडमास्टर डी गुकेश यांच्यासह चार खेळाडूंना खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. क्रीडा मंत्रालयाने गुरुवारी राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार 2024 जाहीर केले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 17 जानेवारी रोजी राष्ट्रपती भवनात विजेत्यांचा सन्मान  करतील.

मनू आणि गुकेश व्यतिरिक्त भारतीय पुरुष हॉकी संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंग आणि पॅरालिम्पियन प्रवीण कुमार यांनाही खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. क्रीडा मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, "समितीच्या शिफारशी आणि सरकारने केलेल्या तपासणीच्या आधारे खेळाडू, प्रशिक्षक, विद्यापीठांना पुरस्कार देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे."

मनू भाकरने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीत 2 पदके जिंकून इतिहास रचला होता. एकाच ऑलिम्पिकमधील एकेरी स्पर्धांमध्ये दोन भिन्न पदके जिंकणारी ती पहिली भारतीय खेळाडू ठरली. याच खेळांमध्ये हरमनप्रीत सिंगने त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय हॉकी संघाला कांस्यपदक मिळवून दिले होते. ऑलिम्पिकमध्ये हाॅकीत भारताने कांस्यपदक जिंकण्याची ही सलग दुसरी वेळ होती. तर डी गुकेश हा काही आठवड्यांपूर्वीच बुद्धिबळाच्या इतिहासातील सर्वात तरुण विश्वविजेता ठरला होता. त्याने वयाच्या अवघ्या 18 व्या वर्षी जगज्जेतेपद मिळविले होते. प्रवीण कुमारने पॅरालिम्पिकच्या T64 प्रकारातील उंच उडी स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. दरम्यान, क्रीडा मंत्रालयाने अर्जुन पुरस्काराने सन्मानित होणाऱ्या एकूण 32 खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. यामध्ये 17 पॅरा ॲथलीट ठेवण्यात आले आहेत.

34 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार...

खेलरत्न व्यतिरिक्त 34 खेळाडूंना 2024 मध्ये क्रीडा क्षेत्रातील त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी अर्जुन पुरस्काराने सन्मानित केले जाईल, त्यापैकी अॅथलीट सुचा सिंह आणि पॅरा जलतरणपटू मुरलीकांत राजाराम पेटकर यांना अर्जुन अवॉर्ड जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केले जाईल. 

उत्तम कोचिंग दिल्याबद्दल पाच जणांना द्रोणाचार्य पुरस्कार मिळेल, ज्यामध्ये बॅडमिंटन प्रशिक्षक एस मुरलीधरन आणि फुटबॉल प्रशिक्षक अरमांडो एगनेलो कोलाको यांचा आजीवन श्रेणीत समावेश करण्यात आला आहे. फिजिकल एज्युकेशन फाऊंडेशन ऑफ इंडियाला राष्ट्रीय क्रीडा प्रोत्साहन पुरस्कार देण्यात येणार आहे. दरम्यान, चंदिगड विद्यापीठाला ओवरऑल यूनिवर्सिटी विजेता म्हणून मौलाना अबुल कलाम आझाद (माका) करंडक देऊन सन्मानित करण्यात येईल. लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी फर्स्ट रनर अप तर अमृतसर गुरु नानक देव युनिव्हर्सिटी सेकंड रनर अप ठरली.

अर्जुन पुरस्कार विजेते...

ज्योती याराजी - ॲथलेटिक्स

अन्नू राणी - ॲथलेटिक्स

नीतू - बॉक्सिंग

स्वीटी - बॉक्सिंग

वंतिका अग्रवाल - बुद्धिबळ

सलीमा टेटे - हॉकी

अभिषेक - हॉकी

संजय - हॉकी

जर्मनप्रीत सिंग - हॉकी

सुखजीत सिंग - हॉकी

राकेश कुमार - पॅरा-तिरंदाजी

प्रीती पाल – पॅरा-ॲथलेटिक्स

सचिन सर्जेराव खिलारी - पॅरा ॲथलेटिक्स

धर्मबीर - पॅरा ॲथलेटिक्स

प्रणव सुरमा - पॅरा ॲथलेटिक्स

एच होकाटो सेमा - पॅरा ॲथलेटिक्स

सिमरन - पॅरा ॲथलेटिक्स

नवदीप - पॅरा ॲथलेटिक्स

तुलसीमती मुरुगेसन - पॅरा बॅडमिंटन

नित्या श्री सुमती सिवन - पॅरा बॅडमिंटन

मनीषा रामदास - पॅरा बॅडमिंटन

कपिल परमार - पॅरा ज्युडो

मोना अग्रवाल - पॅरा शूटिंग

रुबिना फ्रान्सिस - पॅरा नेमबाजी

स्वप्नील सुरेश कुसळे - शूटिंग

सरबज्योत सिंग - शूटिंग

अभय सिंग - स्क्वॉश

साजन प्रकाश - पोहणे

अमन सहव्रत - कुस्ती

अर्जुन पुरस्कार (आजीवन)

सुचा सिंग – अॅथलेटिक्स

मुरलीकांत राजाराम पेटकर - पॅरा जलतरणपटू

द्रोणाचार्य पुरस्कार (नियमित वर्ग)

सुभाष राणा - पॅरा शूटिंग

दीपाली देशपांडे - शूटिंग

संदीप सांगवान - हॉकी

द्रोणाचार्य पुरस्कार (आजीवन वर्ग)

एस मुरलीधरन - बॅडमिंटन

अरमांडो अग्नेलो कोलाको - फुटबॉल

राष्ट्रीय क्रीडा प्रोत्साहन पुरस्कार

फिजिकल एज्युकेशन फाउंडेशन ऑफ इंडिया...

मौलाना अबुल कलाम आझाद (MAKA) ट्रॉफी

चंदीगड विद्यापीठ -  विजेते (overall winner)

लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी - प्रथम रनर अप

अमृतसर गुरु नानक देव विद्यापीठ - द्वितीय उपविजेते

Share this story

Latest