रोहितची धोनीशी बरोबरी !
कोहलीच्या फलंदाजीतील अपयशावर सध्या चर्चा होत आहे. कोहली पुन्हा शुन्यावर बाद झाला. रोहित शर्माने शानदार शतक झळकावून अनेक विक्रम केले. कर्णधार म्हणूनही मोठी कामगिरी केली. रोहित टी-२० मध्ये भारताचा संयुक्त सर्वात यशस्वी कर्णधार ठरला. त्याने माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या सर्वाधिक टी-२० सामने जिंकून देण्याच्या विक्रमाशी बरोबरी केली. रोहितच्या नेतृत्वाखाली संघ ५४ वा सामना खेळत असताना रोहितचा हा ४२वा विजय ठरला.
या अगोदर धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने ४२ सामने जिंकले होते. धोनीबद्दल बोलायचे तर त्याने ७२ सामन्यांत नेतृत्व केले. धोनीच्या विक्रमाशी बरोबरी करण्यासाठी रोहितला अफगाण संघाविरुद्धचे सर्व सामने जिंकाने आवश्यक होते. ती कामगिरी रोहितने करुन दाखवली. रोहितने टी-२० वर्ल्ड कपमध्ये कर्णधारपद भूषवल्यास तो धोनीला मागे टाकू शकतो.