रिषभची जर्सी डगआऊटवर टांगली, बीसीसीआय नाराज
#दिल्ली
आयपीएलमधील लखनऊ सुपर जायंट्सविरुद्धच्या पहिल्या सामन्यात ऋषभ पंतचा दिल्ली कॅपिटल्सकडून करण्यात आलेला सन्मान हा बीसीसीआयला आवडला नाही. या सामन्यात रिषभच्या सन्मानार्थ त्याची जर्सी पॅव्हेलियनवर लटकण्यात आली होती. परंतु दिल्ली संघाच्या या कृतीवर बीसीसीआयने नाराजी व्यक्त केली.
बीसीसीआयला दिल्ली कॅपिटल्सचा सन्मान करण्याचा हा प्रकार आवडला नाही. बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, असा सन्मान एखाद्या मोठ्या कार्यक्रमानंतर किंवा निवृत्तीनंतर दिला जातो. रिषभच्या बाबतीत असे काही झालेले नाही. त्यामुळे दिल्ली कॅपिटल्सने आतापासून असे करू नये.
रिषभ मंगळवारी (दि. ४) दिल्लीत गुजरात टायटन्सविरुद्धचा सामना पाहण्यासाठी येणार असल्याची चर्चा होती. त्याला डगआउटमध्ये निमंत्रित करण्यासाठी फ्रेंचायझीला बीसीसीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक आणि सुरक्षा विभागाची परवानगी घेणे आवश्यक असेल, असे स्पष्ट करण्यात आले होते. दिल्ली कॅपिटल्ससाठी रिषभ हा नेहमीच अविभाज्य भाग राहिला आहे.
रिषभने दिल्ली कॅपिटल्ससाठी आतापर्यंत ९८८ सामने खेळले असून, त्याने एक शतक आणि १५ अर्धशतकांसह ३४.६१ च्या सरासरीने २,८३८ धावा केल्या आहेत. आयपीएलच्या प्रत्येक हंगामात दिल्ली कॅपिटल्स वेगळी जर्सी घालून खेळते. या हंगामातही संघ आयपीएलमधील सामन्यादरम्यान प्रत्येक जर्सीवर पंतचा क्रमांक घेऊन खेळेल. यासोबतच संघाच्या जर्सीचा रंगही वेगळा असेल. तथापि, जर्सीच्या एका कोपऱ्यात हा क्रमांक लहान अक्षरात असेल, यामुळे खेळाडूंच्या संख्येच्या नियमाचे उल्लंघन होणार नाही.
गेल्या वर्षी ३१ डिसेंबर रोजी दिल्लीहून रुरकी येथील आपल्या घरी जात असताना रिषभच्या कारला अपघात झाला होता. यात त्याला गंभीर दुखापत झाली. त्याच्या गुडघ्याचे ऑपरेशन झाले. त्याला तंदुरुस्त होण्यासाठी आणखी किमान ६ महिने लागणार आहेत. वृत्तसंस्था